शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदनगर  जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:05 IST

आरोग्य चांगले राहावे यासाठी गोविंदनगर जॉगिंग ट्रॅकवर सकाळ व सायंकाळच्या सुमारास फिरण्यासाठी असंख्य नागरिक दररोज हजेरी लावतात; परंतु महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे ट्रॅकची देखभालीअभावी दयनीय अवस्था झाली

सिडको : आरोग्य चांगले राहावे यासाठी गोविंदनगर जॉगिंग ट्रॅकवर सकाळ व सायंकाळच्या सुमारास फिरण्यासाठी असंख्य नागरिक दररोज हजेरी लावतात; परंतु महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे ट्रॅकची देखभालीअभावी दयनीय अवस्था झाली असून, ट्रॅकच्या काही भागात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग तसेच खडी व डेब्रिज पडलेले असल्याने हा जॉगिंग ट्रॅक नव्हे तर कचºयाचे आगर असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.महापालिकेच्या वतीने गोविंदनगर ते कर्मयोगी चौक या भागात जॉगिंग ट्रॅक तयार केला असून, दिवसभर उन्हामुळे घराबाहेर पडता येत नसले तरी या ट्रॅकवर सकाळ व सायंकाळच्या सुमारास असंख्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक फिरावयास येतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून मनपाच्या दुर्लक्षामुळे ट्रॅकची दयनीय अवस्था झाली असून, ट्रॅकवर पाणी मारले जात नाही, तसेच साफसफाई केली जात नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. सदाशिवनगर ते कर्मयोगी चौक दरम्यान असलेल्या ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात झाडांचा पालापाचोळा पडलेला असून, ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचले आहेत. यातच याच ट्रॅकवर माती, दगड तसेच डेब्रिज मोठ्या प्रमाणात पडलेले असून, याकडेदेखील मनपाचे लक्ष नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या संपूर्ण ट्रॅकची अवस्था बिकट झाली असून, मनपाने त्वरित सुधारणा करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.वाहनधारक त्रस्तगोविंदनगर बोगदा ते सिटी सेंटर मॉलकडे जाणाºया मुख्य रस्त्यावर हातगाडीचालक तसेच इतर व्यवसाय करणाऱ्यांचे अतिक्रमण वाढले आहे. येथील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढ होत असतानाही मनपाकडून लक्ष देले जात नसल्याने याचा त्रास नागरिकांना तसेच वाहनधारकांना होत आहे.४गोविंदनगर जॉगिंग ट्रॅकवर असलेल्या झाडांचा पालापाचोळा ट्रॅकवर साचत असून, काही काटेरी झाडे असल्याने त्यांच्या फांद्यादेखील ट्रॅकवर पडत असल्याने याचा फिरावयास येणाºया नागरिकांना त्रास होताना दिसून येत आहे. मनपाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्य