शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
2
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
3
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
4
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
5
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
6
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
7
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
8
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
9
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
10
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
11
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
13
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
14
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
15
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
16
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
18
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
19
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
20
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...

‘गोविंद बोलो हरी गोपाल बोलो...’चा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 01:31 IST

गोविंदा रे गोपाळा, तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा...अशा विविध हिंदी मराठी गीतांच्या तालावर ठेका धरत शेकडो गोविंदा आणि गोपिकांच्या उपस्थितीत कृष्णनगरला दहीहंडीचा उत्सव रंगला. शनिवारी सायंकाळी अनेरी मकवाना या गोपिकेने ही दहीहंडी फोडली.

नाशिक : गोविंदा रे गोपाळा, तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा...अशा विविध हिंदी मराठी गीतांच्या तालावर ठेका धरत शेकडो गोविंदा आणि गोपिकांच्या उपस्थितीत कृष्णनगरला दहीहंडीचा उत्सव रंगला. शनिवारी सायंकाळी अनेरी मकवाना या गोपिकेने ही दहीहंडी फोडली.कृष्णनगर येथे कृष्ण मंदिरात गोकुळ जन्माष्टमीनिमित्ताने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो गोविंदांच्या उपस्थितीत आणि विविध हिंदी मराठी गीतांच्या तालावर ठेका धरत नृत्य करत एकावर एक थर करत एका महिला गोपिकाने दहीहंडी फोडली. कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांना गोपाळकाला प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, नगरसेवक मच्छींद्र सानप, प्रियंका माने, पप्पू माने आदींसह श्रीकृष्ण जन्मोत्सव समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.डे केअर शाळाज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ संचलित डे केअर सेंटर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात नाशिक च्या अभिरक्षण गृहातील विद्यार्थ्यांसमवेत दहीहंडी साजरी करण्यात आली. याप्रसंगी अभिरक्षणगृहाचे सचिव चंदुलाल शहा, सार्वजनिक वाचनालयाचे विश्वस्त धर्माजी बोडके, इस्कॉन नाशिकचे संचालक कृष्णा धनराज, संस्थेचे सचिव गोपाळ पाटील, तसेच अभिरक्षण गृहातील शिक्षिका भामरे भंडारी उपस्थित होते. श्रीकृष्णाचे चरित्र व श्रीकृष्णाची माहिती जान्हवी पवार हिने सांगितली. श्रीकृष्णाच्या वेशभूषेतील निकिता हिने गोपालकाला याविषयी माहिती दिली.अभिनव शाळा, मखमलाबादमविप्र समाज संचलित अभिनव बालविकास मंदिर मखमलाबाद शाळेत गोकुळाष्टमीनिमित्ताने दहीहंडी व गोपाळकाला उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संजय फडोल यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णच्या प्रतिमेचे व दहीहंडीचे पूजन करण्यात आले. शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाच्या वेशभूषा परिधान करून या उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. चारुशीला सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक एल. डी. आवारे, के. एस. गावले, डॉ. सुवर्णा गायकवाड, चेतन ठाकरे, प्रेमसिंग शिसोदे आदी उपस्थित होते.आदर्श विद्यालय, एकलहरेजाखोरी येथील मातोश्री भागीरथीबाई निवृत्तीराव पवार आदर्श विद्यालयात गोपाळकाला कार्यक्रम संपन्न झाला. गोपाळकालानिमित्ताने विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या व राधा, गोपिका यांच्या वेषभूषा परिधान केल्या होत्या.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापकआर. बी. गांगुर्डे हे होते. व्ही. बी. चौधरी यांनीकार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या विविध गौळणीचे सादरीकरण केले. यावेळी शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.रूद्र द प्रॅक्टिकल शाळा, उपेंद्रनगरसिडको : उपेंद्रनगर येथील रु द्र द प्रॅक्टिकल शाळेमध्ये दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील बालगोपाळांनी राधा-कृष्णाची आकर्षक वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. शाळेतील पटांगणात बालगोपाळांनी व गोपिकांनी दहीहंडी फोडत श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली. उपस्थिताना प्रसादाचे वाटप करून कार्यक्र माची सांगता करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. स्मिता चौधरी तसेच शिक्षिका व पालक उपस्थित होते.रेडीयंट शाळा, आडगावआडगाव येथील रेडीयंट शाळेत बाळगोपालांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीचा कार्यक्रम व गोपाळकाला उत्साहात साजरा केला. मुख्याध्यापिका गीता व्यास व संचालक हेमंत व्यास यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व कृष्ण प्रतिमेचे पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी शाळेतील बालगटातील विद्यार्थी कृष्ण व राधा यांच्या वेशभूषेत आले होते. शिक्षकांनी विद्याथ्यार्ना श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व तसेच कृष्णाच्या बाललीलांविषयी माहिती देतानाच मुल्यशिक्षणाधारित गोष्टी सांगितल्या. विद्यार्थ्यांनी यावेळी भजन सदर के ले. त्यानंतर ‘ हाथी, घोडा, पालखी... जय कन्हैयालाल की’ जयघोष करीत विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून जल्लोष केला.

टॅग्स :Dahi HandiदहीहंडीNashikनाशिक