शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

राज्यपाल यांचा नियोजित सटाणा दौरा स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 00:23 IST

सटाणा : शहराचे आराध्य दैवत श्री संतशिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराज स्मारक भूमिपूजन समारंभासाठी पालिका प्रशासनाने शहरात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू केलेली असतानाच जिल्ह्यासह तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ४० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने राज्यपाल कोशारी यांचा नियोजित दौरा रद्द न करता स्थगित करण्यात आला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर नववर्षात राज्यपाल कोश्यारी येणार असल्याची माहिती सटाणा शहराचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली.

ठळक मुद्देनिवडणुकीची आचारसंहिता : नववर्षात होणार भूमिपूजन

सटाणा : शहराचे आराध्य दैवत श्री संतशिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराज स्मारक भूमिपूजन समारंभासाठी पालिका प्रशासनाने शहरात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू केलेली असतानाच जिल्ह्यासह तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ४० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने राज्यपाल कोशारी यांचा नियोजित दौरा रद्द न करता स्थगित करण्यात आला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर नववर्षात राज्यपाल कोश्यारी येणार असल्याची माहिती सटाणा शहराचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली.महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सोमवारी (दि. २८) सकाळी ११ वाजता देवमामलेदारांच्या स्मारकाच्या भूमिपूजन समारंभास उपस्थित रहाणार होते. नियोजित स्मारकस्थळी भूमिपूजन सोहळा संपन्न झाल्यानंतर नजीकच असलेल्या दगाजी सिनेमा पॅलेस येथे मुख्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर शहरात पालिका व प्रशासनाने व देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ट्रस्टने जय्यत तयारी सुरू केली होती. शहर नववधूप्रमाणे सजू लागले होते. प्रत्यक्ष स्मारक परिसर, तसेच समारंभस्थळाची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. शहरात विविध ठिकाणी स्वागत कमानी, होर्डिंग्ज, मंदिर सजावट याची तयारी सुरू होऊन पोलीस प्रशासनने बंदोबस्त वाढवत आढावा सुरू केला होता. दरम्यान, सोमवारी (दि. २१) नगराध्यक्ष सुनील मोरे यांना मुंबई येथील राजभवन येथे बोलावून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा नाशिक जिल्ह्यासह बागलाणमधील ४० ग्रामपंचायतींची निवडणूक आचारसंहिता असल्याने दि. २८ रोजीचा दौरा स्थगित करण्यात आला असून आचारसंहिता संपल्यानंतर नववर्षात राज्यपाल महोदय सटाणा येथे येणार असल्याची माहिती देण्यात आली.कामे सुरूच राहणारराज्यपाल कोश्यारी यांचे आगमन नववर्षात होणार असले तरीही स्मारक भूमिपूजनची निगडित सर्व कामे रद्द न करता सुरू ठेवून आचारसंहिता संपल्यानंतर लगेच तारीख घेऊन दौरा आखण्यात येईल अशी माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली आहे.

टॅग्स :Socialसामाजिकgram panchayatग्राम पंचायत