शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

सरकारने महापालिकांना निधी द्यावा, कुठलेही राजकारण करू नये : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 14:34 IST

कुठल्याहीप्रकारचे राजकारण आणू नये. मुंबईपाठोपाठ आता नाशिकही ‘क्रिटिकल’ परिस्थितीत

ठळक मुद्देकेवळ कागदावरच तयारी करून चालणार नाही‘हायरिस्क कॉन्टॅक्ट’च्या तपासणीबाबत पुर्णपणे संभ्रममुंबईतील आकडा दिशाभूल करणारासरकारचे तीन ‘पॉवर सेंटर’ असल्यामुळेच ही अशी अवस्थाशरद पवार यांना मध्यस्थी करावी लागते, हे दुर्दैव

नाशिक : केंद्र सरकारकडून राज्य सरकारला कोरोना आजाराशी सामना करण्यासाठी मुबलक प्रमाणात निधीची उपलब्धतता केली जात आहे. सरकारने राज्यातील विविध महापालिकांनाही निधी वर्ग करून मदत करावी, यामध्ये कुठल्याहीप्रकारचे राजकारण आणू नये. मुंबईपाठोपाठ आता नाशिकही ‘क्रिटिकल’ परिस्थितीत आहे, असे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नाशकात माध्यमांशी बोलताना म्हणाले.नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत असून सुमारे साडेपाच हजाराच्यापुढे कोरोनाबाधितांचा आकडा सरक ला आहे. दरम्यान, बुधवारी (दि.८) फडणवीस नाशिक दौऱ्यावर आले. शहरातील जिल्हा शासकिय रूग्णालय, नाशिकरोड येथील बिटको रूग्णालय, महसूल कार्यालयांना भेटी देत त्यांनी भाजपा शहर कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.यावेळी फडणवीस म्हणाले, रॅपिड अ‍ॅन्टिजन किट मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिले जात आहे. यामुळे कोरोना निदानाच्या चाचण्यांचा वेग वाढणार आहे. सरकारकडून सर्व हॉटस्पॉटवर तातडीने तपासणी करण्याचे निर्देश स्थानिक मनपा व जिल्हा प्रशासनला दिले पाहिजे, तरच कोरोना नियंत्रणात येण्यास मदत होईल. मनपा व जिल्हा प्रशासनाने कोरोनाशी दोन हात करताना केवळ कागदावरच तयारी करून चालणार नाही, तर प्रत्यक्षात शहरात ती तयारी दिसून आली पाहिजे, असेही ते म्हणाले.मुंबईत ‘हायरिस्क कॉन्टॅक्ट’च्या तपासणीबाबत पुर्णपणे संभ्रमवस्था असून या तपासण्याच होत नसल्याची खंतही फडणवीस यांनी बोलून दाखविली. तसेच मास टेस्टिंगही सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. राज्यात कुठेही कोरोना नियंत्रणाबाबतची समाधानकारक स्थिती दिसत नसल्याचे त्यांनी बोलून दाखविले.मुंबईतील आकडा दिशाभूल करणारामुंबईमधील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची आकडेवारी ही पुर्णत: दिशाभूल करणारी आहे. तपासण्या केवळ ३३०० झाल्या म्हणूनच कोरोनाबाधितांचा आकडा ८०६ आला. यापेक्षाही अधिक भीषण परिस्थिती मुंबईत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा कमी पुढे यावा, म्हणून तपासण्यासुध्दा कमी केल्या जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी राज्य सरकारच्या आरोग्य प्रशासनावर केला.मुंबईकरांचे आरोग्य पुर्णपणे धोक्यात टाकले जात आहे, असेही यावेळी म्हणाले.अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुरघोडीचे राजकारणअधिका-यांच्या बदल्यांमध्ये गडबड म्हणजे केवळ कुरघोडीचे राजकारण आणि संवादहिनता असल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारला घेरताना बदल्यांप्रकरणात शरद पवार यांना मध्यस्थी करावी लागते, हे सरकारचे दुर्दैव असल्याचे सांगितले. सरकारचे तीन ‘पॉवर सेंटर’ असल्यामुळेच ही अशी अवस्था होत असल्याचा चिमटाही त्यांनी काढला

टॅग्स :NashikनाशिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSharad Pawarशरद पवार