शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी महसूलमंत्र्यांचा दिलासा : पीकपद्धतीत बदल

By admin | Updated: December 30, 2014 00:18 IST

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी महसूलमंत्र्यांचा दिलासा : पीकपद्धतीत बदल

  नाशिक : अतिवृष्टी, गारपीट व सातत्याने दुष्काळी परिस्थितीत सापडणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा सरकारने निर्णय घेतला असून, रोजगार हमी योजना, जलयुक्ती भूमी अभियान अशा कायम स्वरूपी व तात्पुरत्या योजना राबवितानाच पीकपद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे, प्रतिपादन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केले. शासकीय विश्रामगृहावर खडसे यांच्या उपस्थितीत महसूल, मदत व कार्य, पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास, कृषी व फलोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्धविकास, राज्य उत्पादन शुल्क या विभागाची बैठक घेण्यात आली. त्यात खडसे यांनी प्रत्येक विभागात सध्या सुरू असलेले काम व त्यात येणाऱ्या अडचणींबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना खडसे यांनी, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्यासाठी स्थायी व्यवस्था निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न असून, राष्ट्रीय फळबाग योजना, पीक विमा योजना,नैसर्गिक आपत्तीतील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, वीजबिल माफी, जलसंधारण हे कामे करण्याबरोबरच शाश्वत शेतीसारख्या उपाययोजना अंमलात आणल्या जातील. त्यासाठी नवीन धोरण स्वीकारण्यात येत असून, सरकार स्वयंसेवी संस्था, वित्तसंस्था, विमा कंपन्यांशी चर्चा करणार आहे. प्रामुख्याने अल्प व मध्यम भूधारक शेतकऱ्यांना कर्ज व अडचणीतून सोडविण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातील. त्यामध्ये नॅशनल हार्टीकल्चर मिशन, फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध योजना,पीकपद्धतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी कृषी संशोधन आणि कृषी मालाच्या विक्रीसाठी आडत व्यापारी, बाजार समिती यांच्याशी विचार विनिमय करून उपाययोजना आखल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीस आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी विलास पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर आदि अधिकारी उपस्थित होते.