फेरीवाल्यांना शासनातर्फे अर्थ सहाय्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 09:12 PM2021-02-01T21:12:53+5:302021-02-02T00:48:59+5:30

त्र्यंबकेश्वर : शहरातील पथविक्रेते, फेरीवाले, हातगाडीवाले यांचे लॉकडाउन काळात सर्व धंदे बसले होते. लोकांची उपासमार होत होती. तब्बल दहा ...

Government provides financial assistance to peddlers! | फेरीवाल्यांना शासनातर्फे अर्थ सहाय्य !

फेरीवाल्यांना शासनातर्फे अर्थ सहाय्य !

googlenewsNext
ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : पी एम स्वनिधी योजनेअंतर्गत पथ विक्रेत्यांना मदत

त्र्यंबकेश्वर : शहरातील पथविक्रेते, फेरीवाले, हातगाडीवाले यांचे लॉकडाउन काळात सर्व धंदे बसले होते. लोकांची उपासमार होत होती. तब्बल दहा महिने त्यांनी हे सर्व सहन केले. मात्र पंतप्रधान आत्मनिर्भर स्वनिधी योजने अंतर्गत अशा लोकांना खेळते भांडवल म्हणुन व्यावसायिकांचे बँक खाते असलेल्या वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँकेकडुन १० हजार रुपये कर्ज देण्यासाठी त्र्यंबक नगरपरिषदेच्या माध्यमातुन ७ टक्के सबसिडीने देण्यात येत आहे.
संसाराची गाडी रुळावर येणार...
लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद झाल्याने उपासमारीची झळ सोसणाऱ्या पथ विक्रेत्यांना केंद्र सरकारच्या पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजने अंतर्गत १०००० रुपयांचे खेळते भांडवल मिळून बुस्ट मिळत आहे. त्यामुळे शहरातील पथ विक्रेत्यांच्या संसाराची गाडी रुळावर येणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन मध्ये पथविक्रेत्यांचे व्यवसाय बंद झाले होते. त्यांच्या व्यवसायांना उभारी मिळावी तसेच त्यांचा जीवन जगण्याचा मार्ग सोपा करण्यासाठी केंद्र सरकारने ह्यपंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधीह्ण योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत पथ विक्रेत्यांना खेळत्या भांडवलासाठी कर्जरूपात १० हजार रुपये देण्यात येत आहे. या कर्जाची १२ सुलभ हफ्त्यांमध्ये परतफेड करावी लागणार आहे.

नियोजित काळात कर्जाची परतफेड केल्यास व्याज दरात अनुदान देखील देण्यात येणार आहे. नगरपरिषद हद्दीतील पथ विक्रेत्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी नगरपरिषदेला किती प्रकरणे करायची याचे काही उद्दिष्ट नव्हते.
त्र्यंबक नगर परिषदेकडे एकुण २०१ कर्ज मागणीचे अर्ज आले होते.
त्यापैकी विविध बँकांकडुन १७३ अर्ज बँकांनी मंजुर केले आहेत. म्हणजे त्र्यंबक नगरपरिषदेच्या शिफारशीने विविध राष्ट्रीयकृत बँकांकडून १७३ लाभार्थ्यांना १७ लाख ३० हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
२८ पथविक्रेते, हातगाडीवाले, फेरीवाले आदींची प्रकरणे नामंजुर करण्यात आली. महाराष्ट्र बँकेने याबाबत काहीजण थकबाकीदार होते. तर काही जण दुस-या थकबाकीदाराला जामीन आहेत. तर काहींचा बँकेबाबत अनुभव चांगला नसल्याने त्यांची प्रकरणे नामंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

Web Title: Government provides financial assistance to peddlers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.