शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचा निषेध : महाविद्यालयाच्या द्वारावर नाशिकमध्ये शिवसैनिकांचा ‘गाजर डे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 16:36 IST

काही दिवसांपुर्वीच शिवसेनच्या वतीने द्वारकेवर चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. यावेळी सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त करत सुमारे तीन तास वाहतूक रोखली होती.

ठळक मुद्देकाही दिवसांपुर्वीच शिवसेनच्या वतीने द्वारकेवर चक्का जाम आंदोलनाप्रसंगी रस्त्याने ये-जा करणा-या नागरिकांच्या हातात गाजर देण्यात आले.सरकारला तीन वर्षांमध्ये संपूर्णत: अपयश आले

नाशिक : वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विविध महाविद्यालयांमध्ये तरुणाईकडून ‘डेज सेलिब्रेशन’ केले जाते. या संकल्पनेचा आधार घेत शिवसेनेच्या विद्यार्थी शाखेच्या वतीने शहरातील बीवायके महाविद्यालयाच्या परिसरात भाजप सरकारच्या निषेधार्थ ‘गाजर डे’ साजरा करण्यात आला. या अभिनव आंदोलनाने नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले.भारतीय जनता पार्टीने सामान्य जनतेला निवडणुकपुर्व विविध आश्वासने दिली; मात्र बहुमत मिळवून सत्तेत आल्यानंतर भाजपने तीन वर्षांच्या कार्यकाळात तरु णांपासून जेष्ठांपर्यंत सामान्य जनतेला आश्वासनरुपी गाजर दाखविले. जणू एकप्रकारे सत्ताधारी राज्य व केंद्र सरकारने जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी े गुरूवारी (दि.१५) सरकारचा निषेध ‘गाजर डे’ या अभिनव आंदोलनातूनकेला.राम मंदिर तसेच शिवस्मारक, आंबेडकर स्मारक उभारणीच्या आश्वासनापासून जीवनावश्यक वस्तूंच्या दररोज होणा-या दरवाढ कमी करण्याया आश्वासनापर्यंत कोणतेही आशवासन सरकारने अद्याप पुर्ण केले नाही. या सरकारला तीन वर्षांमध्ये संपूर्णत: अपयश आले असून शेतकर्यांची कर्जमाफी, बाहेर देशातील काळापैसा परत आणणे तरुणांचे शिक्षण व रोजगाराच्या समस्यांवर सरकार सकारात्मक तोडगा काढू शकलेले नाही, असे यावेळी विरोधी पक्षनेता शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी यावेळी सांगितले.बी.वाय.के. कॉलेज येथे भारतीय विद्यार्थी सेनेचा गाजर डे साजरा करून केला सरकारचा निषेध केला. या प्रसंगी गटनेते विलास शिंदे, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक योगेश बेलदार, नगरसेवक डी.जी. सूर्यवंशी, शामकुमार साबळे, संतोष गायकवाड, संदीप गायकर, दिगंबर मोगरे, अमोल सूर्यवंशी, देवा जाधव, अंबादास जोशी, उमेश चव्हाण आदि उपस्थित होते. काही दिवसांपुर्वीच शिवसेनच्या वतीने द्वारकेवर चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. यावेळी सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त करत सुमारे तीन तास वाहतूक रोखली होती.

गाजर वाटप; सरकारच्या निषेधार्थ घोषणाभारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने आंदोलनाप्रसंगी रस्त्याने ये-जा करणा-या नागरिकांच्या हातात गाजर देण्यात आले. कार्यकर्त्यांनी सरकारच्या निषेध व्यक्त करत सरकारने आश्वासनरुपी गाजर जनतेला दाखविल्याचे यावेळी नागरिकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांनी सत्ताधारी सरकारच्या निषेधार्थ विविध घोषणा देत नागरिकांचे लक्ष वेधले. आंदोलनस्थळी सरकारकडून अद्याप जी आश्वासनरुपी गाजर दाखविले गेले त्यांचा उल्लेख व प्रंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र असलेले मोठे फलक उभारण्यात आले होते,.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाNashikनाशिक