शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयाशी शासकीय पत्रव्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 19:18 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून शासनाने राज्यात लॉकडाऊन व संचारबंदी लागू करतांनाच शासकीय कार्यालयांमध्ये संसर्ग वाढू नये म्हणून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कपात केली होती.

ठळक मुद्देकार्यालयातच पत्रे पडून : मार्गदर्शन, प्रस्तावांचा ढीग विकासकामांबाबत कोणताही निर्णय होवू शकलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्याचा शासकीय कामकाजावर झालेला विपरित परिणाम तीन महिन्यांनंतरही जाणवू लागला असून, या काळात शासनाकडून विविध आदेश, सूचना काढण्यात आल्या असल्या तरी, त्याची अंमलबजावणी करताना येणाºया अडी अडचणी, शासनाचे मार्गदर्शन, विकासकामांचे प्रस्ताव व शासनाकडून लागणारी मंजुरी याबाबतचा पत्रव्यवहार त्या त्या शासकीय कार्यालयांमध्येच गेल्या तीन महिन्यांपासून पडून आहे. प्रत्येक विभागाच्या टपाल विभागात मंत्रालयात पाठवायच्या टपालाचे गठ्ठे लागल्याचे चित्र दिसू लागले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून शासनाने राज्यात लॉकडाऊन व संचारबंदी लागू करतांनाच शासकीय कार्यालयांमध्ये संसर्ग वाढू नये म्हणून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कपात केली होती. शासनाच्या या अचानक लागू केलेल्या निर्णयाने विविध खात्यांमध्ये निर्णय प्रक्रियेत असलेल्या कामांना स्थगिती तर मिळालीच परंत त्याबरोबरची कायदोपत्री प्रक्रियाही थंडावली होती. मात्र लॉकडाऊनच्या अगोदर शाासकीय पातळीवरील अनेक निर्णयांसाठी मंत्रालयातील विविध खात्यांकडून मार्गदर्शन मागविण्यासाठी कार्यालयांंनी पत्रव्यवहारही केलेला होता. परंतु मंत्रालयातच मोजके कामकाज या काळात होवू शकल्यामुळे सर्वच खात्यांच्या महत्त्वाच्या फाइल्स, निर्णयप्रक्रियेत असलेले विकासकामांबाबत कोणताही निर्णय होवू शकलेला नाही. मंत्रालयात ही परिस्थिती असताना विभागीय कार्यालये, जिल्हास्तरीय कार्यालये व तालुकास्थित कार्यालयांमध्येदेखील यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. गेल्या तीन महिन्यांपासून शासन दरबारी करावयाच्या पत्रव्यवहाराचे गठ्ठे टपाल खात्यात पडून आहेत. एरव्ही दररोज मंत्रालयात शासकीय पातळीवर करण्यात येणाºया पत्रव्यवहारासाठी दररोज त्या त्या कार्यालयाचा एक व्यक्ती सायंकाळी सर्व महत्त्वाचे टपाल गोळा करून दुसºया दिवशी सकाळी मिळेल त्या वाहनाने मुंबईला रवाना होवून मंत्रालयात वा त्या त्या विभागाच्या मुख्यालयात जाऊन टपालाचे वाटप करून पुन्हा परत येत अशावेळी मुख्यालयात वा मंत्रालयात आपल्या विभागासाठी असलेले टपालदेखील तो घेऊन येत असल्याची पद्धत अवलंबली जात होती. परंतु तीन महिन्यांपासून टपाल जरी स्थानिक पातळीवर जमा होत असले तरी रेल्वे, एसटी खासगी वाहनांना कोरोनामुळे प्रतिबंध घालण्यात आला असल्याने वाहतुकीच्या साधनाअभावी टपाल जैसे थे पडून आहे. या टपालात अनेक महत्त्वाचे निर्णय, शासनाचे मार्गदर्शन, केलेल्या कार्यवाहीचा अहवाल, शासनाला पाठवायची महत्त्वाची माहिती टपालबंद झाली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक