शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
3
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
4
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
5
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
6
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
7
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
8
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
9
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
10
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
11
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
12
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
13
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
14
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
15
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
16
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
17
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
18
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
19
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
20
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

कोर्टाच्या आदेशापूर्वीच शासनाची चतुराई

By admin | Updated: December 2, 2015 22:28 IST

शाळा ग्रंथपालांचा प्रश्न : मागितली पदवीधर, दिली पदविका वेतनश्रेणी

नाशिक : राज्यात सर्वाधिक अवमान याचिकांचा विक्रम शिक्षण विभागावर होण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच राज्य शासनाने शालेय ग्रंथपालांना वेतनश्रेणी देण्यात मोठी चतुराई केली आहे. मंगळवारी (दि.१) उच्च न्यायालयात अंतिम निकाल होणार असल्याची शक्यता असल्याने शासनाने तातडीने पूर्वसंध्येलाच अध्यादेश प्रसिद्ध करून याचिकाकर्त्या २८ ग्रंथपालांना सुधारित वेतनश्रेणी लागू केली आहे. अर्थात ग्रंथपालांनी पदवीधर वेतनश्रेणी मागितली आणि तसे आदेश यापूर्वी उच्च न्यायालयाने दिले असताना शिक्षण खात्याने मात्र पदविका वेतनश्रेणीवरच त्यांची बोळवणूक केली आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी याबाबत शासनाचे आदेश अमान्य केले आहेत.माध्यमिक शाळांमधील पदवीधर ग्रंथपालांना बीएड समकक्ष पदवीधर वेतनश्रेणी मिळावी, अशी मागणी असून, शासनाच्या विरोधात यासंदर्भात निकाल गेले आहेत. पहिल्या काही याचिकांनंतर राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली मात्र उपयोग झाला नाही. सर्वाेच्च न्यायालयाने शासनाची याचिका फेटाळल्यानंतर पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात आली तिही सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली. यादरम्यान राज्यातील अडीचशे ग्रंथपालांना त्यांच्या याचिकेप्रमाणे पदवीधर वेतनश्रेणी देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत; परंतु तरीही राज्य शासन टाळाटाळ करीत असल्याने उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांमध्ये सव्वाशेहून अधिक अवमान याचिका दाखल झाल्या आहेत. तरीही दरम्यानच्या काळात शासनाने न्यायालयाच्या आदेशाच्या आधीन राहून ४० याचिकाकर्त्यांसाठी पदविका वेतनश्रेणी फरकासह देण्याचा अध्यादेश काढला. त्याला विरोध असतानाच नव्याने याचिका दाखल करणाऱ्या २८ याचिकाकर्त्यांना फरकासह डी.एड समकक्ष असलेली पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात बहुतांशी नाशिकचे १ डिसेंबर रोजी ग्रंथपालांच्या याचिकेवर सुनावणी टळली असून, ती आता २७ जानेवारी रोजी होणार आहे. त्यावेळी वकिलांमार्फत बाजू मांडण्यात येईल, असे याचिकाकर्त्यांनी सांगिंतले. (प्रतिनिधी)