घोटी: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालक मंडळाची मुदत गेल्या दीड वर्षापूर्वी संपुष्टात आलेली आहे. मात्र अनेक कारणांनी संचालक मंडळास तीन वेळा मुदतवाढ मिळाली. बाजार समितीच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे व सहकार क्षेत्राचे लक्ष लागले असतानाच पणन व सहकार विभागाने बाजार समितीवर प्रशासक मंडळ नियुक्त केले आहे. संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने प्रशासक मंडळ कारभार पाहत आहेत. सुरुवातीस मुख्य प्रशासक ॲड. संदीप गुळवे, यांच्यासह पाच सदस्य यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झालेली आहे. आज पुन्हा आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नाने खेड गटातील तिघांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. यात वासाळीचे सरपंच काशिनाथ कोरडे, धामणीचे नामदेव भोसले, व गंभीरवाडीचे भगवान भोईर यांचा समावेश झाला आहे.
इगतपुरी तालुक्यात सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी व अग्रगण्य संस्था असलेल्या घोटी बाजार समितीची दोन वर्षांपासून संचालक मंडळाची मुदत संपुष्टात आल्याने या ना त्या कारणाने संचालक मंडळास वाढीव मुदत मिळाली. त्यात पुन्हा कोरोना प्रादुर्भाव, लॉकडाऊन स्थिती यामुळे निवडणुका होऊ न शकल्याने संचालक मंडळ बरखास्त होऊन गेल्या सहा महिन्यांपूर्वी प्रशासक मंडळ अस्तित्वात आले.
यावेळी आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, माजी जि. प. सदस्य जनार्दन माळी, केरु दादा खतेले, माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, वसंत भोसले, काँग्रेस तालुकाध्यक्ष रामदास धांडे वासाळीचे माजी सरपंच लक्ष्मण कोरडे, शांताराम कोरडे, गौतम भोसले, विजय कोरडे, माजी पंचायत समिती सदस्य नामदेव साबळे, लक्ष्मण धांडे व जनार्दन झडे, डॉ. श्रीराम लहामटे, सोमनाथ कोरडे अरुण गायकर, महेश कोरडे, ज्ञानेश्वर कडू आदी उपस्थित होते. (१४ काशिनाथ कोरडे, १४ नामदेव भोसले, १४ भगवान भोईर)
140821\14nsk_17_14082021_13.jpg
(१४ काशिनाथ कोरडे, १४ नामदेव भोसले, १४ भगवान भोईर)