शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

अत्यावश्यक सेवेखाली गोरख धंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 23:40 IST

‘अत्यावश्यक सेवा किराणा माल, शेती औजारे व भाजीपाला’ असा फलक वाहनाच्या पुढच्या काचेच्या बाजूला लावून जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या चालकाला वणी पोलिसांनी अटक केली असून, लॉकडाउनच्या काळात संधिसाधूंचा फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देजनावरांसह मांसाची वाहतूक : दिंडोेरी व सिन्नर तालुक्यात पोलिसांकडून कारवाई

लखमापूर : ‘अत्यावश्यक सेवा किराणा माल, शेती औजारे व भाजीपाला’ असा फलक वाहनाच्या पुढच्या काचेच्या बाजूला लावून जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या चालकाला वणी पोलिसांनी अटक केली असून, लॉकडाउनच्या काळात संधिसाधूंचा फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.वणी पोलीस ठाण्याचे कर्मचारी कोंशिबे, ता. दिंडोरी येथील चौफुलीवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी तैनात होते. यावेळी कोंशिबे परिक्षेत्राचे पोलीस हवालदार अंबादास गायकवाड, पोलीस नाईक अण्णा जाधव, कोंशिबेचे तलाठी महेश भोये, ग्रामसेवक एकनाथ गायकवाड यांनी भनवडकडून लखमापूरकडे जाणारी पिकअप (एमएच १५ एफव्ही ११५२) थांबविली असता पिकअपवर पुढच्या बाजूला ‘अत्यावश्यक सेवा किराणा माल, शेती औजारे व भाजीपाला’ असा फलक लावल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी पिकअपचालकाकडे गाडीत काय आहे, याबाबत चौकशी केली असता वाहनात काही नसल्याची उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्याच वेळी वाहनातून जनावरांचा आवाज आल्यानंतर अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी अधिक तपासणी केली असता वाहनात ४ जनावरे आढळून आली.सदर जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याचे पोलिसांना कळताच चालक सचिन पवार (रा. बजरंगवाडी, विल्होळी) याच्याकडे विचारपूस केली असता त्याने राजू सोनवणे (रा. पिंपळगाव बसवंत) यांच्या सांगण्यावरून वाहतूक करीत असल्याचे सांगितले. पोलिसांनी चार जनावरांसह पिकअप व्हॅन असा सुमारे ५ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त करत चालक आणि राजू सोनवणे यांच्याविरु द्ध गुन्हा दाखल केला.प्राण्यांची क्रूरपणे व इजा पोहचेल असे कृत्य करून गोवंश प्रतिबंधक कायदा तसेच मोटार वाहन कायदा व कोरोनाचे संदर्भातील संचारबंदीचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चालकास अटक केली असून, राजेंद्र सोनवणे यासही पिंपळगाव बसवंत येथे जाऊन अटक करण्यात आली आहे.जनावरांची पांजरापोळला रवानगीपकडलेल्या जनावरांची पशुवैद्यकीय अधिकाºयांकडून तपासणी करून त्यांची येथील श्री कृषी गोशाळा, पांजरपोळ येथे चारापाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी जप्त करण्यात आलेल्या वाहनावर जीवनावश्यक सेवा माल वाहतूक, किराणा माल वाहतूक असा फलक लावण्यात आला होता. मात्र जीवनावश्यक सेवेऐवजी त्यातून जनावरांची बेकायदेशीररीत्या वाहतूक करण्यात आली, यामुळे खोटा परवाना लावून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.आयशरमध्ये कोबीच्या आडून लपवले मांसनांदूरशिंगोटे : भाजीपाला भरलेल्या आयशरमधून जनावरांच्या मांसाची अवैधरीत्या वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार चौथ्यांदा उघडकीस आला आहे. मंगळवारी (दि. १४ ) रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.वावी पोलिसांनी ट्रकसह ५ टन मांस जप्त केले असून, दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नांदूरशिंगोटे-लोणी रस्त्यावर मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास नांदूरशिंगोटे येथे जिल्हा सीमेवरील नाकाबंदीदरम्यान वाहनांची तपासणी सुरू असताना ५ टन जनावरांचे मांस वाहून नेणारा आयशर पकडण्यात आला. या कारवाई पाच लाख रुपये किमतीच्या मांसासह ९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस शिपाई सुधाकर चव्हाणके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इक्बाल अब्दुल रहमान खान (२९), अहसान महम्मद कुरेशी (२२), रा. कसाईवाडा, कुर्ला, मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हे दोघे आयशर ट्रकमध्ये (क्र. एमएच ०४ ऐक्यू ६७२६ ) कोबी व त्याखाली जनावरांचे मांस भरून संगमनेरकडून निमोणमार्गे मुंबईच्या दिशेने निघाले होते. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी कसून चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. वावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रणजित लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पी. के. अढांगळे, पी. सी. भांगरे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार