शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भल्या पहाटे ‘खाकी’ महिलेच्या मदतीला धावली देवदूतासारखी अन‌्....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 21:19 IST

नाशिक : वेळ : पहाटे ३ वाजेची... ठिकाण, गंगापूर गाव...एक वृध्द दाम्पत्य गर्भवती महिलेला धरुन पायी चालत असल्याचे नजरेस ...

ठळक मुद्दे गंगापूर पोलिसांनी घडविले माणुसकीचे दर्शन पोलीस वाहनातून पोहचविले रुग्णालयात गोंडस कन्येला दिला जन्म

नाशिक : वेळ : पहाटे ३ वाजेची... ठिकाण, गंगापूर गाव...एक वृध्द दाम्पत्य गर्भवती महिलेला धरुन पायी चालत असल्याचे नजरेस पडते...पोलिसांच्या वाहनाचा दिवा चमकलेला बघताच ते जागीच थबकतात...रात्र गस्तीचे पोलीस वाहन थांबते अन‌् कर्मचारी खाली उतरतात... तर बघतात की गर्भवती स्त्रीला प्रसूती कळा सुरु झाल्या आहेत. तत्काळ ते वाहनातून बिनतारी संदेश नियंत्रण कक्षाला देतात आणि परवानगी घेत त्वरित त्या वृध्द दाम्पत्यासह गर्भवती महिलेला वाहनात बसवून सायरन वाजवित गंगापूर गावातून गिरणारे ग्रामीण रुग्णालयापर्यंत पोहचवून महिलेला मोठा दिलासा दिला.सोमवारी पहाटेच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाण्याचे पीटर मोबाइल नेहमीप्रमाणे रात्रगस्तीवर होते. यावेळी पहाटेच्या तीन वाजेच्या सुमारास एक वृध्द दाम्पत्य एका गर्भवती महिलेसोबत पायी जात असल्याचे गस्तीपथकाच्या लक्षात आले. त्यामुळे तत्काळ सहायक पोलीस निरिक्षक नितीन पवार यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला बिनतारी संदेश यंत्राद्वारे माहिती दिली. तसेच अतिरिक्त मदत म्हणून गुन्हे शोध पथकाच्या वाहनालाही तत्काळ पाचारण केले. पोलीस नाइक गिरिश महाले, राहुल सोळसे यांच्या मदतीने त्वरित गुन्हे शोध पथकाच्या वाहनात गर्भवती महिला भारती जाधव (२३) आणि त्यांचे सासु-सासरे यांना तत्काळ वाहनचालक दत्तात्रय उगले यांनी गिरणारे रुग्णालयात अगदी कमी वेळेत दाखल केले. वेळेवर गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहचविल्यामुळे प्रसुती कळांपासून होणाऱ्या वेदनांपासून जाधव यांना मोठा आधार मिळाला. पहाटेची वेळ असल्यामुळे कुठल्याहीप्रकारचे वाहन गंगापूर गावापासून उपलब्ध होत नसल्याने ते वृध्द सासु-सासरे हे आपल्या सुनेला पायीच घेऊन रस्त्यावर आले होते आणि योगायोग असा की रात्रीच्या गस्तीपथकाचे याकडे लक्ष वेधले गेले आणि एखाद्या देवदूताप्रमाणेच त्यांनी या महिलेच्या मदतीला धावून जात मानवी संवदेना पोलीस दलात जागृत असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. गिरणारे ग्रामीण रुग्णालयात जाधव यांची यशस्वीरित्या प्रसुती झाली. त्यांनी एका गोंडस कन्येला जन्म दिला.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयpregnant womanगर्भवती महिलाhospitalहॉस्पिटल