लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ज्येष्ठ पौर्णिमा शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी ६.४० वाजेपर्यंत असली तरी वटपौर्णिमा मात्र ज्येष्ठ शु. १४ ला दिलेली आहे. त्यामुळे वटपौर्णिमेबाबत सौभाग्यवतींमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. परंतु, पंचांगकर्त्यांनी गुरुवारी (दि. ८) नेहमीप्रमाणे उपवासासह वटपूजन करण्याचा खुलासा केला आहे. सन २०१५ मध्ये ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा २ जून रोजी होती. त्याच दिवशी वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. सन २०१६ मध्ये दि. २० जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमा असली तरी दि. १९ जून रोजीच शु.१४ ला वटपूजन करण्यात आले होते. यंदाही ज्येष्ठ पौर्णिमेस शु.१४ ला गुरुवारी (दि. ८) सायंकाळी ४.१६ वाजता प्रारंभ होत असून, ती शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी ६.४० वाजेपर्यंत आहे.
सौभाग्यवतींनो, आजच करा वटपूजन!
By admin | Updated: June 8, 2017 01:18 IST