नाशिक : सिडकोतील सिंहस्थनगरमध्ये चोरट्यांनी भरदिवसा घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून पाऊण लाखाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़२८) घडली़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सिंहस्थनगरमध्ये राहणाऱ्या ज्योती संतोष तूपसाखरे रविवारी (दि़ २८) दुपारच्या सुमारास बाहेर गेल्या होत्या़ चोरट्यांनी ही संधी साधून त्यांच्या घराच्या दरवाजाच्या कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला़ घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले ७५ हजार रुपये किमतीचे साडेसात तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले़ त्यामध्ये ३५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, १५ ग्रॅम वजनाचे कानातील झुबे, दहा गॅ्रम वजनाची सोन्याची साखळी यांचा समावेश आहे़ (प्रतिनिधी)
७५ हजार किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले़
By admin | Updated: June 30, 2015 01:07 IST