शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

सोनसाखळीची लूट : नाशिकमध्ये महामार्गावर मोटार अडवून चालकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 19:21 IST

मोटारचालक गावित यांना बाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. चारचाकी अडवून लुटीच्या घटनांपर्यंत आता गुन्हेगारांची मजल गेल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे ५० ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून जबरी लूटपाठलाग करत मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटार अडविली

नाशिक : चारचाकी वाहनाचा दुचाकीवरून पाठलाग करत मोटार अडवून चालकाला मारहाण करून गळ्यातील ५० ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून जबरी लूट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिक-पुणे महामार्गावरून द्वारकेच्या दिशेने कुटुंबासमवेत गिरीश रघुनाथ गावित (४५, रा. तपोवन लिंकरोड) हे त्यांच्या मोटारीने (एमएच १५, ईएन २२९९) मुलीला घेऊन जात होते. दरम्यान, संशयित विक्रांत परदेशी (रा. विसे मळा, गंगापूररोड) याने दुचाकीवरून (एमएच १५, बीझेड ६९७३) पाठलाग करत मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटार अडविली. मोटारचालक गावित यांना बाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात के ली. बेदम मारहाणीदरम्यान, संशयित परदेशी याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून दुचाकीवरून पळ काढला. याप्रकरणी परदेशीविरुद्ध गावित यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयिताविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. संशयिताचा पूर्ण पत्ता नसल्यामुळे तो अद्याप पोलिसांना आढळून आलेला नाही. पोलिसांकडून शोध सुरू आहे.शहरामध्ये जबरी लुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, नागरिकांमध्ये भीती व्यक्त होत आहे. रस्त्याने मार्गस्थ होणेही वाहनचालकांना मुश्कील झाल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. दुचाकीवरून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढण्याच्या घटनांबरोबरच चारचाकी अडवून लुटीच्या घटनांपर्यंत आता गुन्हेगारांची मजल गेल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू असतानाही चोरीच्या घटना घडत असून, चोरटे पसार होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकRobberyदरोडाCrimeगुन्हा