शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

गोडसे ठरले जायंट किलर आघाडी कायम : भुजबळांना प्रत्येक फेरीत दिली मात

By admin | Updated: May 17, 2014 00:43 IST

नाशिक : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते इतकेच नव्हे तर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्रीहे पद भूषवित असलेल्या छगन भुजबळ यांचा धक्कादायक पराभव करीत शिवसेनेचे हेमंत गोडसे जायंट किलर ठरले आहेत. मतदानाचे गुपित मतमोजणीच्या वेळी उकलले आणि सर्वांनी हीच प्रतिक्रिया व्यक्त केली.

नाशिक : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते इतकेच नव्हे तर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्रीहे पद भूषवित असलेल्या छगन भुजबळ यांचा धक्कादायक पराभव करीत शिवसेनेचे हेमंत गोडसे जायंट किलर ठरले आहेत. मतदानाचे गुपित मतमोजणीच्या वेळी उकलले आणि सर्वांनी हीच प्रतिक्रिया व्यक्त केली.छगन भुजबळ व हेमंत गोडसे यांच्या लढतीकडे नाशिकच नव्हे, तर सार्‍या राज्याचे लक्ष लागून होते. गेल्या वेळी समीर भुजबळ यांच्याशी दोन हात करणार्‍या गोडसे यांनी त्यांना चांगलेच जेरीस आणले होते. त्यावेळी समीर भुजबळ यांचा निसटता म्हणजे फक्त २२ हजार मतांनी विजय झाला होता. यंदा छगन भुजबळ यांच्यासारखा वजनदार नेता समोर असल्याने गोडसे यांच्यासमोर आव्हान होते; परंतु त्यांनी ते लिलया पेलले आणि मतदान यंत्रातही ते दिसून आले. पहिल्या फेरीत भुजबळ यांच्यापेक्षा गोडसे ७ हजार १०९ मतांनी पुढे होते. त्यानंतर दुसर्‍या फेरीत ६ हजार ३६८ मतांनी आणखी मताधिक्य वाढले आणि ते एकूण मताधिक्य १३ हजारांवर गेले. त्यानंतर तिसर्‍या फेरीत तर १० हजार ३१३ मताधिक्य मिळवले. चौथ्या फेरीत ६ हजार ५५३, पाचव्या फेरीत ११ हजार २२४, सहाव्या फेरीत ७ हजार ७९८, सातव्या फेरीत ५ हजार ९१५ असे मताधिक्य वाढत गेले. आठव्या फेरीलाच गोडसे यांचे एकूण मताधिक्य ४९ हजार ३६० म्हणजेच सुमारे पन्नास हजार मतांवर गेले होते. त्यानंतर मताधिक्य ५५ हजार २८० वर गेले. नवव्या फेरीत भुजबळांपेक्षा १८०३ इतकीच आघाडी गोडसेंना मिळाली. परंतु त्यावेळी सर्व फेर्‍या मिळून एकूण मतांची आघाडी ६७ हजार ८४१ वर गेली होती. हीच आघाडी वाढत गेली आणि बाराव्या फेरीअंती १ लाख ७ हजार ९५७ इतकी आघाडी झाली. भुजबळ यांना ही आघाडी कमी करून त्यापेक्षा अधिक आघाडी घेणे अखेरपर्यंत शक्य झाले नाही. सोळाव्या फेरीत हेच मताधिक्य दीड लाखांवर पोहोचले. एकूण १ लाख ५४ हजार ८७ मतांची आघाडी गोडसे यांना मिळाली आणि तेविसाव्या म्हणजेच अखेरच्या फेरीत १ लाख ८७ हजार ३३६ मतांनी भुजबळांचा पराभव झाला अन् गोडसे खर्‍या अर्थाने जायंट किलर ठरले.