शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

गोडसे, चव्हाण घेणार मराठीतून शपथ

By admin | Updated: May 23, 2014 00:33 IST

शिवसेनेचे हेमंत गोडसे, भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण खासदारकीची शपथ मराठीतून घेणार.

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्टÑवादीचे हेवीवेट उमेदवार छगन भुजबळ यांच्यावर मात करत ‘जायंट किलर’ ठरलेले शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून हॅट्ट्रिक साधणारे भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण हे खासदारकीची शपथ मराठीतून घेणार आहेत. दरम्यान, पुणे येथील भारत विश्व ज्ञानपीठम्चे कुलपती डॉ. विजय भटकर आणि शारदा ज्ञानपीठम्चे संस्थापक पंडित वसंतराव गाडगीळ यांनी महाराष्टÑातील सर्व खासदारांना संस्कृतमधून शपथ घेण्याचे आवाहन केले आहे. सोळाव्या लोकसभेचा कालावधी ३१ मे रोजी संपुष्टात येत असून, त्यापूर्वी नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधीचा कार्यक्रम पूर्ण करावा लागणार आहे. २६ मे रोजी नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा होणार असून, त्यानंतर २७ मेपासून नव्या लोकसभेच्या कामकाजास सुरुवात होणार आहे. पंतप्रधानांच्या शपथविधीनंतर खासदारांचा शपथविधीचा कार्यक्रम राबविला जाणार असल्याने नवनिर्वाचित खासदारांकडून ते कोणत्या भाषेत शपथ घेणार याबाबतचे पत्र राष्टÑपती कार्यालयाकडून भरून घेतले जात आहे. त्यानुसार नाशिकचे नवनिर्वाचित खासदार हेमंत गोडसे व दिंडोरीचे नवनिर्वाचित खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मराठी भाषेतून शपथ घेतली जाणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, पुणे येथील भारत विश्व ज्ञानपीठम्चे कुलपती डॉ. विजय भटकर व शारदा ज्ञानपीठम्चे संस्थापक पंडित वसंतराव गाडगीळ यांनी महाराष्टÑातील सर्व नवनिर्वाचित खासदारांना पत्र पाठवून संस्कृत भाषेत शपथ घेण्याचे आवाहन केले आहे. १९९१ मध्ये लोकसभेचे सभापती बलराम जाखड यांच्यासह ५३ सदस्यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली असून, यंदाही जास्तीत जास्त खासदारांनी संस्कृतमधून शपथ घ्यावी, यासाठी शारदा ज्ञानपीठम्चे प्रबंध संपादक वासुदेव डोंगरे स्वत: शपथविधीच्या सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहून खासदारांना विनंती करणार आहेत. (प्रतिनिधी)