पिंपळगाव बसवंत : परिसरातील अंबिकानगर येथील देवीचा माथा जिल्हा परिषद परिषद शाळा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्र म पार पडले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करून ग्रामपंचायत सदस्य सुहास मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मुख्याध्यापक देवेंद्र वाघ, हरीष पटेल, सुरेश गायकवाड, मोतीराम पवार, दत्तात्रय धाडीवाल, माणिक शेवरे, भगवान कांबळे, अनिता गायकवाड, मनोज शेवरे, भारत गायकवाड, युवराज बेंडकुळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. रणजित देवरे यांनी सूत्रसंचालन केले, तर संजय जाधव यांनी आभार मानले. मंगल देवरे, सुरेखा जाधव, इम्रान पठाण यांनी परिश्रम घेतले.यावेळी शाळेचे शिक्षक रणजित देवरे यांनी शाळेला दूरदर्शन संचभेट दिला, तर उत्कृष्ट कला सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक देवेंद्र वाघ यांनी बक्षीस दिले. अंबिकानगर येथे भारतमातेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शरद शेखरे, विश्वनाथ कराटे, शरद पवार, तुकाराम धुळे, नाना कुमावत, लखन शिंदे, नाना गायकवाड, अनिल घुले, हनुमंत शेवरे, अनिल झेंडफळे, रमण गहिले, संजय बनकर आदी उपस्थित होते.
देवीचा माथा शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्र म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:29 IST