शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

गोदावरीचा रौद्रावतार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 01:54 IST

गंगापूर धरणक्षेत्रात शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे अंबोली, त्र्यंबक भागातून मोठ्या प्रमाणात धरणात पाणी आल्याने गंगापूर धरणातून विसर्ग वाढविण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी सायंकाळी ५ हजार ८३० क्यूसेकपर्यंत विसर्ग सुरू होता, मात्र शनिवारी सकाळी ११ वाजता थेट ५ हजाराने विसर्गामध्ये वाढ करण्यात आली. दुपारी २ वाजेपासून सायंकाळपर्यंत १७ हजार ७४८ क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आल्याने गोदावरीला मोठा पूर आला.

ठळक मुद्देदुतोंड्या मारुती बुडाला ; १७ हजार क्यूसेकचा विसर्ग; रामसेतूवरून पुराचे पाणी

नाशिक : गंगापूर धरणक्षेत्रात शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे अंबोली, त्र्यंबक भागातून मोठ्या प्रमाणात धरणात पाणी आल्याने गंगापूर धरणातून विसर्ग वाढविण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी सायंकाळी ५ हजार ८३० क्यूसेकपर्यंत विसर्ग सुरू होता, मात्र शनिवारी सकाळी ११ वाजता थेट ५ हजाराने विसर्गामध्ये वाढ करण्यात आली. दुपारी २ वाजेपासून सायंकाळपर्यंत १७ हजार ७४८ क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आल्याने गोदावरीला मोठा पूर आला.तीन वाजेच्या सुमारास नाशिककरांची पारंपरिक पूरमापक असलेली दुतोंड्या मारुतीची मूर्ती डोक्यापर्यंत बुडाली. तसेच कपालेश्वर मंदिराच्या पहिल्या पायरीला पाणी लागले. गोदाकाठावरील जवळपास सर्वच लहान-मोठ्या मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.शुक्रवारी मध्यरात्रीपासून पुढील दोन दिवस पश्चिम, मध्य महाराष्टÑासह कोकण व नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. घाटक्षेत्राच्या परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली गेली. त्यानुसार जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढला. गंगापूर धरणात त्र्यंबक, अंबोली या पाणलोटक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. परिणामी गंगापूर धरणाचा जलसाठा ८५ टक्क्यांवर पोहोचल्यानेधोक्याची पातळी गाठल्याचा इशारागोदावरी नदीला आलेल्या पुराने शनिवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास धोक्याची चेतावणी गाठली. अहल्यादेवी होळकर पुलाखाली असलेल्या पूरमापक पट्टीवरील १९ हजार ७९ फुटांपर्यंत असलेली धोक्याची चेतावणी देणारी रेषा आहे. या रेषेपर्यंत पुराचे पाणी शनिवारी दुपारी लागले. दुपारी दीड वाजेच्या सुमारास १ हजार ८४८ फुटापर्यंत पाणी लागले होते. त्यानंतर दुपारी साडेचार वाजता १९ हजार ७९ फुटापर्यंत पुराची पातळी वाढली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून गोदावरीने धोक्याची चेतावणी गाठल्याचे जाहीर करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरीfloodपूर