शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गोदापात्रातील पाण्याबाबतचा अहवाल अविश्वसनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:46 IST

गोदावरी नदीपात्रातील पाण्याच्या बीओडीचा अविश्वसनीय आणि दिशाभूल करणारा अहवाल नाशिक महानगरपालिका प्रशासनाने सादर केल्याचा प्रकार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या बैठकीत उघड झाला. यावेळी विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.

ठळक मुद्देविभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांची आढावा बैठक

नाशिकरोड : गोदावरी नदीपात्रातील पाण्याच्या बीओडीचा अविश्वसनीय आणि दिशाभूल करणारा अहवाल नाशिक महानगरपालिका प्रशासनाने सादर केल्याचा प्रकार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या बैठकीत उघड झाला. यावेळी विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.गोदावरी नदी प्रदूषण जनहित याचिकेत या विषयावर उपाययोजना करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने जानेवारी महिन्यात विविध विभागांच्या स्तरावरील जबाबदाऱ्या आणि त्यांनी हाताळावयाचे विषयानुसार आणखी पाच उपसमित्या तयार करून त्यांना त्यांनी केलेल्या कामकाजाचा मासिक अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार या उपसमित्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे सचिव उपायुक्त ज्ञानेश्वर खिल्लारे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.बैठकीत गोदावरी नदी पात्रातील पाण्याचा बीओडीचा मुद्दा चांगलाच गाजला. गोदापात्रातील पाण्याचा बीओडी हा आजवर ३० पेक्षा कमीच असल्याचा पालिकेच्या अधिकाऱ्यांचा दावा यावेळी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी खोडुन काढत बीओडी ५८ ते ६० असल्याचा लेखी अहवालच समितीपुढे सादर केला. यावेळी दोन्ही बाजुंकडून आपलाच अहवाल सत्य असल्याचा आग्रह धरण्यात आला. यावेळी मनपाने मलनिस्सारण केंद्राच्या ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेशही माने यांनी दिले. एमआयडीसी स्तरावरील उपसमितीचा अहवाल पुढील महिन्यात सादर करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हा परिषद स्तरावरील उपसमितीचे प्रतिनिधी या बैठकीस गैरहजर राहिले. गोदापात्रातील कॉँक्रिटीकरण काढण्याच्या मुद्द्यावर ‘निरी’चे सहकार्य घेण्याची सूचना माने यांनी केली. मलनिस्सारण केंद्र अद्ययावत करण्याचे, प्रदूषण रोखण्यासाठी ग्रीन पोलिस यंत्रणा राबविण्याचे, पुलांवर जाळ्या बसविण्याचे आणि नदी पात्रातील अतिक्रमणे त्वरित हटविण्याचे आदेशही माने यांनी दिले.चार कारखाने बंदगोदावरी व उपनद्यांच्या प्रदूषणास हातभार लावल्याचे निदर्शनास आल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने आतापर्यंत ३८ कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत. एका कंपनीला अंतरिम आदेश, तर अंबड एमआयडीसीतील युनायटेड इंडस्ट्रीज, रचना इल्क्ट्रोमेक्स, पुष्कर इंडस्ट्रिज, ग्रीन कोट्स या चार कारखान्यांवर बंदची कारवाई केली आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारgodavariगोदावरी