शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

मच्छीमारांसाठी गोदावरीनदी जीवनदायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 17:54 IST

चांदोरी : नाशिक, मराठवाडा व नगरची जीवनदायि असलेल्या गोदावरी नदीमुळे सिंचनाची सोय तर झाली आहे. याशिवाय मासेमारी व्यवसायातूनही वर्षभराचा रोजगार प्राप्त झाला आहे. निफाड तालुक्याच्या गोदाकठील अनेक गावातील मच्छीमारबांधव या व्यवसायावरच आपली उपजीविका करतात. गोदाकाठावरील भूमीहीन बेरोजगारांसाठी गोदा व दारणा नदी जीवनदायिनी ठरत आहे.

चांदोरी : नाशिक, मराठवाडा व नगरची जीवनदायि असलेल्या गोदावरी नदीमुळे सिंचनाची सोय तर झाली आहे. याशिवाय मासेमारी व्यवसायातूनही वर्षभराचा रोजगार प्राप्त झाला आहे. निफाड तालुक्याच्या गोदाकठील अनेक गावातील मच्छीमारबांधव या व्यवसायावरच आपली उपजीविका करतात. गोदाकाठावरील भूमीहीन बेरोजगारांसाठी गोदा व दारणा नदी जीवनदायिनी ठरत आहे.निफाड तालुक्यातील चेहेडी, दारणासांगवी, लालपाडी, चाटोरी, चांदोरी, सायखेडा, शिंगवे, करंजगाव येथील शेकडो भूमीहीन बेरोजगार व मच्छीमार गोदावरीनदीत दररोज मासेमारी करतात. गोदावरी नदीत मासेमारीसाठी गेल्यानंतर ते रिकाम्या हाताने परत येत नाही. त्यामुळे बारमाही वाहणारी ही गोदावरीनदी मासेमार बांधवांसाठी वरदान ठरत आहे. नदीत असंख्य डोह तसेच खोलवर पाण्याचे खडकाळ भाग आहेत. खोलवर पाण्यात रोहू, कतला, मरट, झिंगे, कोंबडा, मरळ, बळू आदी प्रजातींचे मासे आढळतात. तीन ते चार किलोग्रॅमपासून १८ ते २० किलोपर्यंतच्या घोगर व जरंग मासे पाहावयास मिळतात.अतिशय दुर्मळ मासे सुद्धा येथे दिसून येतात. परिसरातील भूमीहीन बेरोजगार दिवसा तर काही रात्रीच्या शांत वातावरण गळ व वाबरीच्या (मासे पकडायची जाळे) सहाय्याने मासेमारी करतात. तर काही मासेमार युवक ट्यूबच्या मदतीने थेट नदीपात्रात उतरतात व ठिक- ठिकाणी जाळे लावून मासेमारी करतात. तसेच काही मासेमार इतर ओहळ व मोठे नाले यामध्ये सुद्धा मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.पावसाळ्यातील तीन महिने नदीपात्रातील मासेमारी बंद असते. मात्र पात्राच्या बाहेर मासेमारी केली जाते. वर्षातून जवळपास सात ते आठ महिने मासेमारी करता येते. त्यामुळे गोदावरी नदी मासेमारांसाठी जीवनदायिनी ठरत आहे.पानवेलीमुळे माश्याचे अस्तित्व धोक्यातमागील काही महिन्यांपासून नदी पात्रात असलेल्या पाणवेलीमुळे मासेमारी करणे अवघड झाले आहे. तसेच पाणवेलीमुळे पाण्यात असलेल्या माश्यांना ऑक्सिजनचा पुरठवा नियमित मिळत नसल्याने व पाण्यात मुक्त संचार करता येत नसल्याने काही मासे मृत होत आहे. यामुळे मासेमारी करणाऱ्यांच्याचा उदरनिर्वाहात देखिल अडथळे येत आहेत.मागील १५ वर्षापासून आम्ही गोदावरी नदी पात्रात मासेमारी करून उदरनिर्वाह करत आहोत. सद्यस्थिती पाहता गोदावरी नदीचे वाढते प्रदूषण व पाणवेलीची समस्या बघता दिवसेंदिवस मासे मिळण्याची संख्या कमी झाली आहे.- बाळू आंबेकर, मासेमार,चांदोरी.गोदावरी पात्रात मिळणारे मासे हे अतिशय चांगले व चविष्ट असतात. आम्ही पकडलेले मासे जवळ असलेल्या गावात आठवडे बाजारात व नाशिक शहरात विक्रीसाठी पाठविले जातात. नवनाथ डगळे, स्थानिक मासेमार. (१९ चांदोरी)