गोदावरीच्या समृद्ध वारसा सादरीकरणाने गोदा उत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 01:39 AM2021-12-16T01:39:09+5:302021-12-16T01:39:42+5:30

गोदावरी नदीतील अतिक्रमणांमुळे गोदावरी नदीचा नैसर्गिक प्रवाह नष्ट होत आहे. गोदापात्रात कोणत्याही स्वरूपाचे अतिक्रमण होता कामा नये, यासाठी शासकीय यंत्रणांनी पुढाकार घ्यायला हवा. नदीपात्रातील प्राचीन कुंड वाचली तर नदीचा नैसर्गिक प्रवाह आपण सुरक्षित करू शकतो. त्यामुळे यापुढील काळात ही सर्व कुंड पुन्हा निर्माण करता येतील का त्याचा अभ्यास व्हायला हवा, असे गोदावरीचे अभ्यासक देवांग जानी यांनी सांगितले.

Goda festival begins with presentation of rich heritage of Godavari | गोदावरीच्या समृद्ध वारसा सादरीकरणाने गोदा उत्सवाला प्रारंभ

गोदावरीच्या समृद्ध वारसा सादरीकरणाने गोदा उत्सवाला प्रारंभ

googlenewsNext

नाशिक : गोदावरी नदीतील अतिक्रमणांमुळे गोदावरी नदीचा नैसर्गिक प्रवाह नष्ट होत आहे. गोदापात्रात कोणत्याही स्वरूपाचे अतिक्रमण होता कामा नये, यासाठी शासकीय यंत्रणांनी पुढाकार घ्यायला हवा. नदीपात्रातील प्राचीन कुंड वाचली तर नदीचा नैसर्गिक प्रवाह आपण सुरक्षित करू शकतो. त्यामुळे यापुढील काळात ही सर्व कुंड पुन्हा निर्माण करता येतील का त्याचा अभ्यास व्हायला हवा, असे गोदावरीचे अभ्यासक देवांग जानी यांनी सांगितले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी नाशिक, राज्य पुरातत्व विभाग व नाशिक इतिहास संशोधन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गोदावरी उत्सवाच्या वारसा फेरीप्रसंगी त्यांनी गोदावरीच्या उगमस्थानापासूनच्या प्रवासाची सविस्तर माहिती दिली.

गोदावरी उत्सव व वारसाफेरीचे उद्घाटन जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सौ. मयूरा मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडे, पुरातत्व विभागाच्या उपसंचालिका आरती आळे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, नाशिक इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष योगेश कासार पाटील, आनंद बोरा, डॉ. अजय कापडणीस, महेश शिरसाट उपस्थित होते. पंचवटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, सरकारवाडा पोलीस निरीक्षक राजन सोनवणे यावेळी उपस्थित होते. या उत्सवाची सुरुवात बुधवारी सकाळी गोदाकाठावर देवमामलेदार महाराज मंदिरासमोरून वारसा फेरीच्या माध्यमातून झाली. कुंडांचे अभ्यासक देवांग जानी यांनी गोदाकाठावरील कुंड आणि त्यांचा इतिहास यावेळी सांगितला. गोदावरी काठावरील कुंडांची माहिती देताना त्यांनी नकाशाच्या माध्यमातून सादरीकरण केले. यावेळी पूजा नीलेश यांचा सुलेखन प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला, तर चित्रकार रमेश जाधव यांनी गोदावरी व नदीसंदर्भातील चित्रांचे सादरीकरण केले होते. याला नाशिककरांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यानंतर प्रा. सुरेखा बोऱ्हाडे यांनी यावेळी गोदावरी नदी याविषयी एकपात्री नाटक सादर करील उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर गजानन महाराज गुप्ते मंदिरात चित्रकार रमेश जाधव यांनी गोदावरी या विषयावर साकारलेली दीडशेहून अधिक चित्रांच्या प्रदर्शनाला जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांनी भेट दिली. रमेश पडवळ अश्मयुगीन इतिहास, नदीचे महत्त्व, नदी संस्कृत आणि नदीभवतीची वारसास्थळांची माहिती दिली. देवमामलेदार मंदिर, दुतोंड्या मारुती, अहिल्याराम मंदिर, कृष्ण मंदिर व नारोशंकर मंदिर अशी वारसाफेरी पार पडली.

इन्फो

गोदावरी हा सर्वाधिक मौल्यवान ठेवा

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी चित्रकार रमेश जाधव यांच्या चित्रांचे कौतुक करीत त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांवर काढलेल्या चित्रांचे पुस्तक जिल्हा प्रशासनातर्फे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची घोषणा केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गोदावरी नदी व त्याकाठची वारसास्थळे नाशिकची अत्यंत मौल्यवान संपत्ती असल्याचे सांगितले. ती जपण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. हा वारसा जपत आपल्याला विकास साधायला आहे. गोदावरीविषयी असलेल्या विशेष प्रेमामुळे नाशिकशी आपले नाते घट्ट झाले आहे. गोदावरी नदीबद्दल आपल्या सर्वांच्या मनात आदरभाव निर्माण होण्याची गरज असल्याचे पांडे यांनी सांगितले.

 

Web Title: Goda festival begins with presentation of rich heritage of Godavari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.