कंधाणे : येथील पठावा रोड शेतीशिवारात घरापासून हाकेच्या अंतरावर चरण्यासाठी बांधलेल्या शेळीवर दुपारच्या सुमारास बिबटयाने अचानक केलेल्या हल्ल्यात शेळी ठार झाली. येथील पठावा रोड शेतीशिवारातील गटनंबर १०९ मध्ये अशोक दौलत देवरे वास्तव्यास आहेत. नेहमी प्रमाणे त्यांनी आपल्या शेताच्या बांधाला चरण्यासाठी शेळी बांधून ते घरातील सदस्यांसह शेती कामात व्यस्त होते. दुपारच्या सुमारास मकाच्या शेतात सावजच्या शोधात दबा धरून बसलेल्या बिबटयाने शेळीवर हल्ला करून शेळी ठार केली. शेजारील शेतकरी विनायक देवरे आपल्या घराकडे जात असतांना त्यांना बिबटया दिसताच त्यांनी आरडाओरड करण्यास सुरूवात करतास बिबटयाने मकाच्या शेतात धुम ठोकली. एवढया आठवडयातच परिसरात बिबटयाच्या हल्ल्यात दोन ते तीन पाळीव जनावरांना आपला जीव गमवावा लागला आहे. वनविभागाचे वनरक्षक पाटील यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. या भागात ब-याच दिवसापासून बिबटयाचे वास्तव्य आहे.
कंधाणेत बिबटयाच्या हल्ल्यात शेळी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 18:26 IST