शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

लक्ष्य : दोडी व दापूरच्या रेशनदुकानदारांचे चोरले रॉकेल

By admin | Updated: January 31, 2015 23:35 IST

‘मोलामहागा’च्या रॉकेलवर चोरट्यांचा डल्ला

नांदूरशिंगोटे : संपूर्ण राज्यभरात रॉकेल कपातीचे धोरण राबविण्यात आल्याने शिधापत्रिकेवर मिळणारे रॉकेल ‘महागा’चे बनले आहे. त्यामुळे चोरट्यांनी स्वस्त धान्य दुकानदारांच्या रॉकेललाच ‘लक्ष्य’ केले.सिन्नर तालुक्यातील दोडी व दापूर येथील रेशनच्या रॉकेलवर चोरट्यांनी डल्ला मारून सुमारे ७०० लिटर रॉकेल चोरून नेल्याची घटना घडली. तालुक्यात मोठ्या प्रमाणात रॉकेल कपात करण्यात आल्याने रेशनदुकानदारांचा कोठा कमी झाला आहे. त्यामुळे प्रत्येक शिधापत्रिकेवर केवळ एक लिटर रॉकेल मिळत आहे.प्रत्येक घरात रॉकेल अत्यावश्यक बाब असल्याने रॉकेलचे महत्त्व वाढले आहे. चोरट्यांनी दोडी व दापूर येथील रेशन दुकानदारांच्या रॉकेलवर लक्ष्य ठेवून रात्रीच्या वेळी दुकानाबाहेर असणाऱ्या टाक्यांमधून रॉकेल चोरून नेल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. दोडी खुर्द येथील मोहन विश्वनाथ दिवटे या दुकानदारांकडून शिधापत्रिकेवर रॉकेल विक्री केली जाते. चोरट्यांनी दिवटे यांचे ५०० लिटर रॉकेल टाक्यांसह चोरून नेले, तर दापूर येथील अजित सोमाणी यांचे २१० लिटर रॉकेल टाकीसह चोरट्यांनी चोरून नेले. सुमारे ११ हजार रुपये किमतीचे सदर रॉकेल चोरीला गेल्याने ग्राहकांची गैरसोय झाली. याप्रकरणी दोडी खुर्द व दापूर येथील रेशनदुकानदारांनी वावी पोलीस ठाण्यात रॉकेल चोरीची फिर्याद दिली आहे. (वार्ताहर)