शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शहरातून काचबिंदू जनजागृती फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:06 IST

‘काचबिंदूने गमावलेली दृष्टी परत येत नाही’, ‘काचबिंदूवरील औषधे नियमित घ्या’, ‘डोळे दुखले जरा, काचबिंदूची चाचणी करा’ अशा प्रबोधनपर घोषवाक्यांचे फलक हाती घेत शहरातून काचबिंदू जनजागृती फेरी काढण्यात आली.

नाशिक : ‘काचबिंदूने गमावलेली दृष्टी परत येत नाही’, ‘काचबिंदूवरील औषधे नियमित घ्या’, ‘डोळे दुखले जरा, काचबिंदूची चाचणी करा’ अशा प्रबोधनपर घोषवाक्यांचे फलक हाती घेत शहरातून काचबिंदू जनजागृती फेरी काढण्यात आली.राज्य नेत्रतज्ज्ञ संघटना व नाशिक नेत्रतज्ज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल गायकवाड, नेत्रतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. नानासाहेब खरे व सचिव डॉ. कुणाल निकाळे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. आवेश पलोड आदींच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.या रॅलीत इंडियन मेडिकल असोसिएशन, रोटरी क्लब, राइझिंग सन फाउण्डेशन, मविप्र वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, आॅप्टोमेट्री महाविद्यालयाचे विद्यार्थी, जिल्हा रुग्णालयाच्या नेत्रचिकित्सा विभागाचे सर्व कर्मचारी, वैद्यकीय प्रतिनिधी आदी संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काचबिंदू या नेत्रविकाराबाबातची जनजागृती समाजात व्हावी, जेणेकरून काचबिंदूच्या आजारावर नियंत्रण मिळविता येईल, या उद्देशाने ही फेरी काढण्यात आली होती.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलStudentविद्यार्थी