शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कारची काच फोडली अन‌् दोन लाखांची रोकड लांबविली; भरदिवसा घडली घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 13:03 IST

नाशिक : शहर परिसरात लुटीच्या घटना सातत्याने घडत आहे. सोनसाखळी चोरीच्या घटनांना अद्याप आळा बसलेला नसताना सातत्याने वाहनांमधून मौल्यवान ...

ठळक मुद्देसीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे आदेश

नाशिक : शहर परिसरात लुटीच्या घटना सातत्याने घडत आहे. सोनसाखळी चोरीच्या घटनांना अद्याप आळा बसलेला नसताना सातत्याने वाहनांमधून मौल्यवान वस्तूंसह रोकड असलेल्या बॅग चोरट्यांकडून भरदिवसा लंपास केल्या जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. कॅनडाकॉर्नरवर बुधवारी (दि.२१) अशाचप्रकारे एका व्यावसायिकाच्या कारच्या खिडकीची काच फोडून अज्ञात चाेरट्याने २ लाख १६ हजारांची रोकड असलेली बॅग पळविल्याची घटना उघडकीस आली आहे.

शहर व परिसरात घडणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये अनलॉक होताच वाढ झाल्याचे दिसून येत आहे.सोनसाखळी चोरी, घरफोडी, मोबाइल चोरी, वाहनचोरी, बॅग लिफ्टिंगसारख्या गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त केली जात आहे. पाथर्डीफाटा येथील रहिवासी असलेले प्रसाद अरुण सोनार हे नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या मोबाइल शॉपीवर आले. त्यांनी आपली चारचाकी दुकानाजवळ उभी केली. यावेळी बँकेत भरण्यासाठी आणलेली  रोकड असलेली बॅग कारमध्ये ठेवून कार लॉक करत दुकानात गेले.

दुपारी दोन वाजेच्या सुमारास ते बँकेत जाण्यासाठी कारजवळ आले असता कारच्या खिडकीची काच फोडलेली त्यांना दिसली. त्यांनी घाईघाईने कारमध्ये ठेवलेली बॅग तपासली असता ती आढळून आली नाही. तसेच आयफोन मोबाइल, पासपोर्ट आदी महत्त्वाच्या कागदपत्रांचाही अपहार करण्यात आल्याचे दिसून आले. याबाबत त्वरित सोनार यांनी पोलिसांना माहिती कळविली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी हे पथकासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी याबाबत जवळचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले. सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyचोरीtheftचोरी