शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

योग्य उपचारांनी हृदयविकाराच्या रुग्णांना जीवनदान: चोपडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 01:31 IST

हृदयविकाराचा झटका आला तर रुग्णाच्या जवळचे सर्वच घाबरून जातात. परंतु, अशा परिस्थितीत घाबरून न जाता योग्य उपचार करून रुग्णावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने व आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने उपचार केले तर अत्यवस्थ रुग्णांनाही जीवनदान मिळणे शक्य असल्याचे प्रतिपादन हृदयविकार तज्ज्ञ डॉ. मनोज चोपडा यांनी केले.

नाशिक : हृदयविकाराचा झटका आला तर रुग्णाच्या जवळचे सर्वच घाबरून जातात. परंतु, अशा परिस्थितीत घाबरून न जाता योग्य उपचार करून रुग्णावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने व आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने उपचार केले तर अत्यवस्थ रुग्णांनाही जीवनदान मिळणे शक्य असल्याचे प्रतिपादन हृदयविकार तज्ज्ञ डॉ. मनोज चोपडा यांनी केले.शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात रामनाथ चांडक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संस्कृती वैभवतर्फे ‘हृदयविकार : काळजी, उपाय व उपचार’ व्याख्यानमालेचे शनिवारी (दि.२०) उद्घाटन झाले. व्यासपीठावर राधाकिसन चांडक, दीपक चांडक, डॉ. चेतन पाटील, डॉ. श्रीकांत उपासणी उपस्थित होते. यावेळी ‘रोबोटिक एन्जिओप्लास्टी’ विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी हृदयाच्या अतिशय किचकट शस्त्रक्रियाही रोबोटीक तंत्रज्ञानाने करणे शक्य असल्याचे सांगितले. तर भारती भूलतज्ज्ञ संघटनेच्या नाशिक शाखाध्यक्षा डॉ. सुनीता संकलेचा यांनी ‘सीपीआर’ विषयावर मार्गदर्शन करताना हृदयविकाराच्या प्रसंगी प्रथमोपचाराने रुग्णांना जीवन संजीवनी देणे शक्य असल्याचे सांगितले. प्रास्ताविक नंदन दीक्षित यांनी केले. पल्लवी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. कैवल्य जोशी यांनी आभार मानले.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य