शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

करारानुसार पाणी द्या, चाऱ्यांची दुरस्ती करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 01:08 IST

जळगाव नेऊर : येथील जलसिंचन शाखा कार्यालयात वितरिका क्र मांक २७ ते ३२ वरील पाणी वापर संस्था अध्यक्ष, सचिव ...

ठळक मुद्देमागणी : पाणीवापर संस्थेच्या सभेत चर्चा

जळगाव नेऊर : येथील जलसिंचन शाखा कार्यालयात वितरिका क्र मांक २७ ते ३२ वरील पाणी वापर संस्था अध्यक्ष, सचिव यांची विशेष सभा पालखेड पाटबंधारे उपविभाग शाखाधिकारी दीपक नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी करारानुसार पाणी देण्याची आणि मुख्य चाऱ्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी शाखाधिकारी दीपक नरोटे यांनी सिंचन पद्धतीचे शेतकºयांकडून व्यवस्थापन कायदा अंतर्गत नियोजित पाणीवापर संस्था मुख्य प्रवर्तक व अन्य पदाधिकारी यांची निवड करून ठराव देण्याच्या सूचना केल्या. यावेळी पाणी वापर संस्था पदाधिकाºयांनी पाणी कोटा किती मिळेल, करारनाम्याप्रमाणे पाणी पूर्ण मिळेल का, सिंचन पाणीवाटपासाठी शासकीय कर्मचारी उपलब्ध होतील का, मुख्य चाºयांची दुरु स्ती करावी, आदी विविध प्रश्न उपस्थित केले. बैठकीस १७ सहकारी पाणीवापर संस्थांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते. या सहकारी पाणीवापर संस्थापैकी आठ पाणीवापर संस्थांनी ठराव मंजूर करण्यास सहमती दर्शवली, तर उर्वरित संस्थांनी वरील प्रश्न उपस्थित केले.पाणीवापर संस्थेच्या पदाधिकार्यांनी करारनाम्याच्या कोट्याप्रमाणेच पाणी मिळावे, यासाठी शाखाधिकारी दीपक नरोटे यांच्याकडे मागणी करत आग्रह धरला. यावेळी कालवा निरीक्षक ए.एल. थोरात ,आर. ई. बोरसे यांचेसह विठ्ठल आहेर, लक्ष्मण गुंड ,उत्तम तांबे ,मल्हारी दराडे, पोपटराव बोराडे, संपत कदम, दत्तू साळवे ,नानासाहेब कदम, पोपट शेळके, विकास गायकवाड,देवीदास कदम, अंबादास खुळे, भाऊसाहेब गचाले, उत्तम सोनवणे, शाम शिंदे,सुरेश वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.संस्थेला करार नाम्याप्रमाणे पाणी कोटा देण्यात येऊन संस्थेच्या संयुक्त पाहणी प्रमाणे कामे करून देण्यात यावी व मुख्य चारीला झालेले अतिक्र मण काढून देण्यात यावे,तरच संस्था हस्तांतरित करून घेण्यात येतील.- मल्हारी दराडे, अध्यक्ष, मतोबा पाणीवापर संस्था, जऊळके. 

 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासWaterपाणी