शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

शेतकऱ्यांना कर्जमुक्त केल्यास पाठिंबा देऊ !

By admin | Updated: February 17, 2017 00:47 IST

उद्धव ठाकरे यांचा अल्टिमेट्म : मोदी, फडणवीस यांच्यावर टीका

नाशिक : उत्तर प्रदेशातील निवडणुकीत सत्ता येत नाही हे पाहून तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आमिष दाखविणाऱ्या भाजपाने गेल्या अडीच वर्षांपासून फक्तथापाच मारल्या असून, त्यांना शेतकऱ्यांचा इतकाच कळवळा असेल तर त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे. तसेच त्यानंतरच्या काळात बिनव्याजी कर्ज दिल्यास शिवसेना भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा अल्टिमेट््म शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. नाशिक महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित जाहीरसभेत ते बोलत होते. आपल्या भाषणात ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर टीका केली. येवला तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याने शेतातील कांदा जाळून टाकल्याचा संदर्भ देत ते म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून गारपीट, दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने चांगले दिन येण्याची आशा होती, परंतु पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदी लादून दुष्काळात तेरावा महिना निर्माण केला. शेतकरी, सामान्य व्यक्ती त्यात भरडून निघाला, पन्नास दिवस, शंभर दिवस उलटूनही काहीच साध्य झाले नाही. उलट शेतकऱ्यांना आयकर लागत नाही हे माहीत असूनही त्यांना बॅँकेत खाते उघडण्यास भाग पाडून त्यांच्याकडील नोटा बॅँकेत भरून घेतल्या नजीकच्या काळात याच शेतकऱ्यांना आयकराच्या कक्षेत आणण्याचा डाव खेळला जाणार असून, शेतकऱ्यांना आयकर लागणार नाही हे सरकारने जाहीर करावे, असे आव्हान त्यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता ठाकरे पुढे म्हणाले, देशात सध्या भय व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकेकाळी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचे भाषणे होत होती, त्यात आचार, विचार असायचे, त्यांची वाणी, भाषा संयमी होती. परंतु दुर्दैवाने आता तशा प्रकारचे विचार देणारा नेताच देशात राहिलेला नाही, तर धमकी देणारा नेता दुर्दैवाने देशाला लाभला आहे, अशी टीका करून देशात भयावह वातावरण निर्माण करणाऱ्यांनी देशद्रोही, गुंडांवर आपला धाक निर्माण केला पाहिजे. परंतु एकेकाळी ज्या व्यासपीठावर साधू-महंत बसत होते त्या व्यासपीठावर गुंड-पुंड बसू लागल्याने देशात कसे परिवर्तन कसे होईल? असा सवालही त्यांनी विचारला. भाजपाकडून गुंडांना पावन करण्याचा उद्योग सुरू झाला असून, असे गुंड आमच्या अंगावर सोडण्याचा प्रयत्न होणार असेल व ते जर गुंड आमच्या आया-भगिणींकडे वाकड्या नजरेने पाहणार असेल तर शिवसैनिक त्याचे हात काढून गुंडाच्या हातावर ठेवण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा देत ठाकरे यांनी, गेल्या २५ वर्षांपासून निव्वळ हिंदुत्व, राष्ट्रियत्व व भगवा झेंडा पाहून शिवसेना भाजपाच्या पाठीशी पहाडासारखी उभी राहिली. मोदी यांच्या प्रचारासाठी मीच जाहीरसभा घेतल्या, परंतु देशात व राज्यात सत्ता आल्यानंतर त्यांना सेना नकोशी झाली. अडीच वर्षांपासून फक्त थापा मारून सत्ता भोगली जात आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री हे कोणत्याही एका पक्षाचे नसतात, सर्वांना समान वागणूक देण्याची त्यांनी शपथ घेतलेली असते. परंतु सध्या हे दोघेही निवडणूक प्रचारासाठी बोंबलत फिरत असून, कारभाराच्या नावाने ठणाणा सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. नाशकात शिवसेनेची सत्ता असताना बरीच कामे झाली, परंतु गेल्या पाच वर्षांत काहीच झाले नाही. शिवसेनेने त्यावेळी दिलेली वचने पूर्ण केली, काय केले हे सांगण्यापेक्षा करून दाखवलं ही सेनेची कार्यपद्धती राहिली आहे. सेनेत नाकर्त्यांची अवलाद नाही, जे करता येईल तेच आश्वासन शिवसेना देते, असे सांगून ठाकरे यांनी साडेसात मीटर व नऊ मीटर रस्त्यावरील बांधकामांचा प्रश्न राज्य सरकारच्या अखत्यारित असला तरी, शिवसेनेची महापालिकेत सत्ता आल्यास हा प्रश्न सोडविण्यासाठी आपण स्वत: प्रयत्न करू तसेच झोपडपट्टीवासीयांना आहे तेथेच घरकूल देण्यात येईल. शहरात महापालिकेचे अद्ययावत रुग्णालयाची उभारणी, मोफत औषधोपचार, व्हर्चूअल शाळा, बससेवा सुरू करण्याची घोषणा केली. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, उपनेते बबन घोलप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर आदिंची भाषणे झाली. प्रारंभी ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, स्व. बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. ठाकरे यांचे व्यासपीठावर आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीतील उमेदवार व्यासपीठावरच विराजमान करण्यात आले होते.