येवला : विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळण्यासाठी विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिवाळी विशेष आनंदमेळा येथील टिळक मैदानातील मुरलीधर हॉलमध्ये भरवण्यात आला होता. या आनंद मेळ्यात विद्यार्थ्यांनी स्वत: बनविलेल्या अनेक गोष्टी विक्रीसाठी ठेवल्या होत्या. यात ग्रीटिंग कार्ड, फुलदाणी (फ्लावर पॉट) आकाश कंदील, कुंदन , पतंग, बंगल्स (बांगड्या) तसेच शाडू मातीच्या वेगवेगळ्या मूर्ती इत्यादी वस्तूंची विक्री करण्यात आली. याचबरोबर या आनंदमेळ्यात अनेक खाद्यपदार्थदेखील विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. यात पाणी-पुरी, वडापाव, गुलाब जामून, केक, दाबेली इत्यादी गोष्टींचा समावेश होता. जणू काही ती एक खाद्यपदार्थांची मेजवानी होती. खाद्यपदार्थांच्या या मेजावानीबरोबर विविध मनोरंजक कार्यक्र मांचेदेखील आयोजन करण्यात आले होते. आनंद मेळ्याचे उद्घाटन संस्कृतीकार प्रभाकर झळके यांच्या हस्ते झाले. यावेळी झळके यांनी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध विक्री वस्तू बघितल्या व मुलांना प्रोत्साहन म्हणून काही भेटकार्ड तसेच फुले खरेदी केली. या स्पर्धेचा निकाल सौ.नीता परदेशी, सौ. संघवी, सौ. पाटील यांनी जाहीर केला. यामध्ये चित्रकला स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना डॉ. सौ. संगीता पटेल व सौ. कनक पटेल डॉ. राजेश पटेल व देवेंद्र पटेल यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. आनंद मेळ्यात अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील विविध महिला मंडळांना आमंत्रित करण्यात आले होते. आनंदमेळा यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. मुख्याध्यापक शुभांगी शिंदे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
वस्तूविक्र ीची रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी देणार
By admin | Updated: October 25, 2016 00:40 IST