नाशिक : शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, नाहीतर सत्तेतून बाहेर पडू असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. चोपडा लॉन्स येथे सुरू असलेल्या कृषी अधिवेशनात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सत्तेत असताना विरोध केला की प्रश्न विचारतात की सत्तेत असून विरोध कसा, पण आमची बांधिलकी समाज आणि शेतकऱ्यांशी आहे. मुख्यमंत्री विरोधात असताना कर्जमाफी मागायचे, आता सत्तेत आल्यावर त्यांचे अभ्यासू विद्यार्थ्यात रूपांतर झाले आहे. सरकार बदलले तरी शेतकऱ्यांचे प्रश्न ‘जैसे थे’ च आहे. मध्यावधीसाठी चाचपणी करण्याऐवजी शेतकरी कर्जमुक्त करण्यावर भर द्या. असे केल्यास शिवसेनेचे सर्व मंत्री सत्ता सोडून बाहेर पडून सत्तेसाठी पाठिंबा देतील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, नाहीतर सत्तेतून बाहेर पडू : उद्धव ठाकरे
By admin | Updated: May 19, 2017 15:54 IST