शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
4
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
5
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
6
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
7
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
8
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
9
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
10
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
11
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
12
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
13
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
14
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
15
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
16
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
17
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
18
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
20
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?

जिल्हाभरात मुलीच ठरल्या अव्वल; करिअरच्या वाटा शोधण्याकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 00:57 IST

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी/मार्च २०२० मधील बारावी परीक्षेचा निकाल आॅनलाइन पद्धतीने जाहीर झाला आहे.

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी/मार्च २०२० मधील बारावी परीक्षेचा निकाल आॅनलाइन पद्धतीने जाहीर झाला आहे. जिल्हाभरात विविध महाविद्यालयाच्या बारावी निकालात यंदा विद्यार्थिनींनी बाजी मारल्याचे दिसून आले आहे, तर परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात येऊन पुढील परीक्षेस सामोरे जाण्याचे आवाहनही करण्यात आले. यामुळे काही ठिकाणी ‘कही खुशी, कही गम’ असे चित्र पहावयास मिळाले, तर करिअर निवडीसाठी विविध क्षेत्रांमधील संधींचा शोध घेण्यात येत आहे.----------------आरबीएच कन्या कनिष्ठ महाविद्यालय ९३ टक्केमालेगाव : येथील आरबीएच कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचा कला व विज्ञान शाखेचा बारावीचा निकाल सरासरी ९३.१२ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के, तर कला शाखेचा ८९.०१ टक्के लागला. विज्ञान शाखेतून एकूण ११७ विद्यार्थिनी परीक्षा दिली. सर्वच्या सर्व विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. रक्षा देवेंद्र शेलार (८४ टक्के) प्रथम, सृष्टी योगेश हिरे (८२.७६) द्वितीय, तर प्रांजली नागेश निकम (८०.७६) हिने तृतीय क्रमांक मिळवला. कला शाखेतील १७३ विद्यार्थिनींपैकी १५४ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. यशश्री प्रशांत देशपांडे (८८.६१) प्रथम, सोपिया शकील मेमन (८४.३०) द्वितीय, अश्विनी संजय शिल्लक (७५.८४) हिने तृतीय क्रमांक मिळवला. यशस्वी विद्यार्थिनींचे श्रीमती ए. जे. जोंधळे, उपप्राचार्य आर. जी. पाटील, पी. सी. पाटील व के. डी. पवार, सी. टी. कापडणीस आणि सर्व प्राध्यापक व सर्व शिक्षक यांनी कौतुक केले.--------------रु ई उच्च माध्यमिक विद्यालयलासलगाव : रुई येथील रयत शिक्षणसंस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाचा निकाल ९८.४१ टक्के लागला असून, संदीप यादव वाघ (८२.४१) विद्यालयातून प्रथम आला आहे.माधुरी शंकर होन (७४.७६), गायत्री चंद्रकांत तासकर (७२.९२) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन अ‍ॅड. भगीरथ शिंदे, वैष्णवधाम रामकृष्णहरी मठाचे ह.भ.प. ज्ञानेश्वर माउली शिंदे, शिवाजी रोटे, जगन्नाथ तासकर, त्र्यंबक चव्हाणके, कोंडाजी गायकवाड, आर. व्ही. गवळी, आरती पोटे, मीरा शिंदे, विनोद गावकर, सविता चव्हाणके, रोहिणी दरेकर, अश्विनी गवळी, पी. टी. धोंडगे, एस. जे. पाडवी, जी. एन. तेलोरे, एल. एस. डगळे आदी उपस्थित होते.----------------खेडगाव नवोदयचा निकाल १०० टक्केदिंडोरी : मानव संसाधन विकास मंत्रालयद्वारा संचलित जवाहर नवोदय विद्यालय खेडगावचा बारावी व दहावीचा निकाल 100 टक्के लागला. बारावीत ८७ टक्के विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत व १०० टक्के विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तसेच दहावीत ७५ टक्के विद्यार्थी मेरीट श्रेणीत व ९५ टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. बारावीत उदय नवरे ९५.८० टक्के घेऊन प्रथम, प्रियंका साठे ९३.२० टक्के घेऊन द्वितीय व अथर्व बनकर ९३ टक्के प्राप्त करून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तसेच दहावीत समीक्षा देवरे ९७.०४ टक्के घेऊन प्रथम, प्रथमेश निकम ९५.०८ टक्के घेऊन द्वितीय व चेतना ठोके ९५.०६ टक्के प्राप्त करून तृतीय स्थानावर उत्तीर्ण झाले. दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात ६, गणितात २ व समाजशास्त्रात १ अशा प्रकारे विद्यार्थांना १०० पैकी १०० गुण प्राप्त झाले. बारावीच्या परीक्षेत जीवशास्त्र विषयाची सरासरी ८९.९२ तर दहावीच्या परीक्षेत मराठी विषयाची सरासरी ९४.९७ अव्वल आहे.विद्यालयाचे प्राचार्य एन. डी. ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विषय शिक्षक अनिता चौधरी, विनय सोनार, शंकर कटारिया, जालिंदर हासे,प्रदीप वाघमारे, महेंद्रप्रताप सिंह, राजू पारडे, संपदा साधू, शुभांगी लोडम, रोहिदास वाबळे,सुरेंद्र नरड यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात शारीरिक अंतर राखत यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

टॅग्स :Nashikनाशिक