शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

...तर मुलींनी दुर्गावतार दाखवावा - आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 18:07 IST

नाशिक : मुलांपेक्षा मुली नक्कीच अधिक बुद्धिवान असून, त्यांच्यात निर्णयक्षमता जास्त असते. त्यामुळे बाका प्रसंग ओढवल्यास मुलींनी घाबरून जाऊ नये, प्रतिकारासाठी धाडस करून स्वत:मधील दुर्गा, कालिकेचा अवतार छेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या टवाळखोराला दाखवून द्यावा, असे आवाहन शिवसेना युवासेनेचे आदित्य ठाकरे यांनी केले.शिवसेना युवा सेनेच्या वतीने शहरातील हनुमानवाडी लिंकरस्त्यावर एका लॉन्समध्ये ...

ठळक मुद्दे मुलांपेक्षा मुली नक्कीच अधिक बुद्धिवान मुलींनी दाखविले प्रात्यक्षिकविद्यार्थिनींना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून स्वसंरक्षण धडे

नाशिक : मुलांपेक्षा मुली नक्कीच अधिक बुद्धिवान असून, त्यांच्यात निर्णयक्षमता जास्त असते. त्यामुळे बाका प्रसंग ओढवल्यास मुलींनी घाबरून जाऊ नये, प्रतिकारासाठी धाडस करून स्वत:मधील दुर्गा, कालिकेचा अवतार छेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या टवाळखोराला दाखवून द्यावा, असे आवाहन शिवसेना युवासेनेचे आदित्य ठाकरे यांनी केले.शिवसेना युवा सेनेच्या वतीने शहरातील हनुमानवाडी लिंकरस्त्यावर एका लॉन्समध्ये आयोजित स्वसंरक्षण उपाययोजना वर्गाच्या समारोपप्रसंगी ठाकरे बोलत होते. मुलींवर होणा-या वाढत्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी युवासेनेच्या वतीने त्यांना प्रतिकार करण्यासाठी स्वसंरक्षणार्थ धडे देण्यात आले. यामध्ये हातातून हात निसटून सुटका करणे, हल्लेखोरांनी गळा दाबून धरला असल्यास तसेच दोन्ही हातांनी आवळून धरून ठेवण्याचा प्रयत्न केल्यास प्रतिकार करत त्याच्या तावडीतून कसे निसटावे, त्याने डोक्याच्या केसांना घट्ट धरून ठेवल्यास अन् धारधार शस्त्राचा धाक दाखविल्यास कसा प्रतिकार करावा, याबाबत तज्ज्ञ कराटे प्रशिक्षकांनी सुमारे तीन ते चार तास उपस्थित शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थिनींना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून धडे दिले. यावेळी शहरातील सुमारे दहा ते बारा शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.यावेळी आदित्य म्हणाले, हल्लेखोरांच्या बाबतीत मुलींनी सतर्कता बाळगावी. बाका प्रसंग ओढवल्यास त्या हल्लेखोराच्या संवेदनशील अवयव उदा. डोळे, कान, नाक यावर आघात करण्याचा प्रयत्न करावा. यावेळी धीर धरावा आणि ‘बचाओ-बचाओ’चा आवाज अधिक जोरजोराने काढण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून लोकांचे लक्ष वेधले जाईल आणि हल्लेखोराच्या पोटातही भीतीचा गोळा उठेल. दरम्यान, आदित्य यांनी विद्यार्थिनींसोबत ‘सेल्फी’सेशनही केले. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे, गटनेता विलास शिंदे, अजय बोरस्ते, माजी महापौर विनायक पांडे, सचिन मराठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.मुलींनी दाखविले प्रात्यक्षिकप्रशिक्षक मेहुल वोरा, अनिल भोसले, जस्मीन मकवाना, संजय दरेकर या कराटे प्रशिक्षकांनी उपस्थित दहा ते बारा शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे दिले. यावेळी प्रशिक्षकांनी सांगितलेल्या उपाययोजनांप्रमाणे मुलींनी स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक उपस्थित अन्य विद्यार्थिनींपुढे सादर केले. दरम्यान, काही मुलींनी प्रशिक्षण वर्गाविषयीचे मनोगतही व्यक्त केले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेNashikनाशिकUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसWomenमहिला