शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत दहावी परीक्षेत मुलींची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 01:17 IST

दहावी परीक्षेत पंचवटी परिसरातील विविध ठिकाणच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. दहावीच्या परीक्षेत यंदाच्या वर्षीदेखील काही शाळांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे.

पंचवटी : दहावी परीक्षेत पंचवटी परिसरातील विविध ठिकाणच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. दहावीच्या परीक्षेत यंदाच्या वर्षीदेखील काही शाळांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे.नवीन आडगाव नाका येथील तपोवन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्री स्वामीनारायण इंग्लिश मीडियम स्कूल ९९.२९ टक्के इतका निकाल लागला. विद्यालयात तिन्ही मुलींनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तसेच तृतीय क्रमांक पटकाविला आहे. अनुष्का तुकाराम केंद्रे या विद्यार्थिनीने ९१.६० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर गायत्री वसंत घुले ही विद्यार्थिनी द्वितीय क्र मांकाची मानकरी ठरली. तिला शेकडा ९०.२० टक्के गुण मिळाले आहे. तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या पूर्वा पंकज पाटील हिला ८९.६० टक्के गुण मिळाले. उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे स्वामी ज्ञानपुराणी, माधव प्रकाश स्वामी, मुख्याध्यापक अस्मिता पटेल उपस्थित होते.पुणे विद्यार्थिगृह संचलित काकासाहेब देशमुख विद्यालयाचा परीक्षेचा ८० टक्के निकाल लागला आहे. महाविद्यालयात यंदा तिन्ही विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्र मांक पटकावला आहे. वैभव भास्कर वानखेडे या विद्यार्थ्याला शेकडा ९०.२० टक्के गुण मिळाले तो विद्यालयात प्रथम क्र मांकाने उत्तीर्ण झाला, तर अविनाश किसन थविल याने ७४.८० टक्के गुण मिळवून द्वितीय क्र मांक मिळविला. विक्र ांत रवींद्र केकाने या विद्यार्थ्याने ७२.८० टक्के गुण मिळवत विद्यालयात तृतीयक्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला. संस्थेच्या वतीने या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संचालक अमोल जोशी, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर निंबकर उपस्थित होते.दिंडोरीरोडवरील डॉ. काकासाहेब देवधर इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता दहावीचा ९८ टक्के निकाल लागला आहे. विद्यालयात तीनही विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीयक्र मांक पटकावण्याचा मान मिळविला आहे. आकांक्षा भोंगे या विद्यार्थिनीने शेकडा ९५ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्र मांक मिळविला, तर समृद्धी शिंदे ही द्वितीय क्र मांकाने उत्तीर्ण झाली. तिला शेकडा ९३ टक्के गुण मिळाले तृतीय क्र मांकाने उत्तीर्ण झालेल्या तेजल भालेराव हिने ९२.८० टक्के गुण मिळविले परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपकार्याध्यक्ष संजय गुंजाळ मुख्याध्यापक भारती पाटील उपस्थित होते.श्रीराम विद्यालय ९१.६६ टक्केतरुण ऐक्य मंडळ संचलित श्रीराम विद्यालयाचा इयत्ता दहावी परीक्षेचा ९१.६६ टक्के इतका निकाल यावर्षी लागला. माध्यमिक शालांत परीक्षेसाठी एकूण ३२४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी सुमारे ३०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.युनिव्हर्सल अकॅडमी इंग्लिश स्कूलचा निकाल ८९.६० टक्के लागला. परीक्षेत साक्षी रोकडे हिने ८५.६० टक्के गुण मिळवत प्रथम, तर प्रतीक्षा काळे हिने ८३.६० टक्के गुण द्वितीय, मृदुला पटाईत हिने ८२.८० टक्के मिळवून तृतीय क्र मांक मिळविला.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालWomenमहिलाSchoolशाळा