शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्लॅकमेलिंग’मुळे तरुणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 01:39 IST

गंगापूररोडवरील एका वीसवर्षीय तरुणीने एका ३८ वर्षीय शिवाजी प्रभाकर केदारे (रा.नाशिकरोड) नावाच्या व्यक्तीकडून लग्नासाठी होणाऱ्या ‘ब्लॅकमेलिंग’ला कंटाळून गोदापात्रात उडी घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.३) उघडकीस आली आहे.

नाशिक : गंगापूररोडवरील एका वीसवर्षीय तरुणीने एका ३८ वर्षीय शिवाजी प्रभाकर केदारे (रा.नाशिकरोड) नावाच्या व्यक्तीकडून लग्नासाठी होणाऱ्या ‘ब्लॅकमेलिंग’ला कंटाळून गोदापात्रात उडी घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.३) उघडकीस आली आहे. याप्रकरणी मयत युवतीच्या आईने गंगापूर पोलीस ठाण्यात संशयित केदारेविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नवीन गोदापार्क परिसरातील बापू पुलावरून रोशनी दिलीप हिरे (२०, गंगापूररोड) या युवतीने नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.२) घडली होती. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात युवतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी केदारेविरुध्द सोमवारी फिर्यादी मनीषा दिलीप हिरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोशनीचा विवाह या महिन्याच्या २० तारखेला होणार होता; मात्र शिवाजीला ही बाब खटकल्याने तो लग्नासाठी रोशनीवर दबाव वाढवित होता. त्याने तिच्या काही छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली. तसेच तीच्या आईवडीलांना मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. केदारे हा एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने ज्या मुलाशी तिचा विवाह होणार होता, त्या मुलालाही त्यांच्या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. त्यामुळे तीचा होणारा विवाह धोक्यात आला. परिणामी केदारेच्या जाचाला कंटाळून आणि आलेल्या नैराश्यापोटी अखेर रोशनीने जीवनयात्रा संपविली. तीने रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास गोदापात्रात उडी घेतल्याने तीचा मृत्यू झाला होता. गंगापूर पोलिसांनी प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. सोमवारी रोशनीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेऊन हकिगत सांगितली असता पोलिसांनाही धक्का बसला. केदारेच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून त्यास अटक केली आहे. त्याला मंगळवारी न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक निरीक्षक नितीन पवार करीत आहेत.यापूर्वीही दोनदा मोडला विवाहरोशनीचा विवाह यापूर्वीही दोन वेळा जमला होता; मात्र केदारे याच्या प्रतापामुळे दोन्हीही वेळा तिचा विवाह मोडला. तिसऱ्यांदा मोठ्या मुश्किलीने तिचा विवाह कुटुंबीयांनी जमवून आणला असता पुन्हा संशयित केदारे याने खोडा घालत होणाºया वर मुलाला भेटून खोटे सांगत विवाह मोडण्यासाठी प्रयत्न केल्याचे समजते. केदारे हा विवाह समारंभात फटाके पुरविण्याचे काम करतो व तो विवाहित असल्याचे समजते.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक