नाशिक : शहरात लॉकडाउनमुळे चौकाचौकात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे गंगापूर पोलीस ठाणे तसेच मुंबई नाका पोलीस ठाणे येथे चहा तयार करण्याच्या यंत्राची (टी वेंडिंग मशीन) सुविधा करण्यात आली आहे. यावेळी प्राचार्य प्रशांत पाटील, अभियंता विजय बाविस्कर, उद्योजक अशोक कटारिया, सचिन पाटील, सुरेश कापडिया, पोलीस निरीक्षक डॉ. मुदगल आदी उपस्थित होते.
पोलिसांसाठी चहा तयार करण्याचे यंत्र भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 00:15 IST