शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प दाम्पत्याला टोपी-उपरणे, साडी अन् कांदे भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 05:44 IST

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना शेतकऱ्याचे पत्र । कांदा उत्पादकांच्या मांडल्या व्यथा

नाशिक : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलनिया यांना निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकºयाने गांधी टोपी, उपरणे, साडी व कांदे भेट म्हणून पाठविले आहेत. सोबत कांदा उत्पादकांच्या व्यथा त्यांना लिहिलेल्या पत्रातून मांडल्या आहेत. नाशिकच्या कांद्याची अमेरिकेत निर्यात व्हावी, यासाठी ट्रम्प यांनी प्रयत्न करण्याची विनंतीही शेतकºयाने केली आहे.

२४ आणि २५ फेब्रुवारीला ट्रम्प दाम्पत्य भारताच्या दौºयावर येत असून त्यांच्या मेजवानीत कांद्याचा वापर करावा यासाठी नैताळे येथील शेतकरी संजय साठे यांनी कांदे पाठवले आहेत. संबंधित भेट त्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे दिल्लीत पाठविली आहे. सोबत एक पत्र, टोपी, शाल, आणि पत्नीसाठी साडीही पाठवली आहे. त्यात महाराष्टÑाचा कांदा आरोग्यास कसा चांगला आहे, हे सांगितले आहे. आपण अमेरिकेसाठी येथून कांदा आयात करावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे भारतातील शेतकऱ्यांचे जीवनमान कसे उंचावेल, कर्जातून कशी मुक्तता मिळेल यासाठी शिष्टाई करावी, असे आवाहन ट्रॅम्प यांना केले आहे. साठे यांनी यंदा कांद्याची लागवड केली परंतु अवकाळी पावसामुळे कांद्याचे अतोनात नुकसान झाले. निर्यात बंदीमुळे अपेक्षित भाव मिळाला नाही.अमेरिकेला कांदा निर्यात करून शेतकºयांना दिलासा मिळावा म्हणून तेथील राष्ट्राध्यक्षांना कांदा पाठून जेवणाच्या मेजवणीत खाण्याचे आवाहन केले आहे.- संजय साठे,शेतकरी, नैताळे 

टॅग्स :NashikनाशिकDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प