शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घोटी खुर्दच्या सरपंच पदच्युत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 01:33 IST

इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच मंदाकिनी गोडसे यांचे कुणबी जातप्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. त्यांचा इतर मागास प्रवर्गातील कुणबी जातीचा दावाही अवैध ठरविण्यात आल्याचा आदेश नाशिकच्या जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे.

ठळक मुद्देजातप्रमाणपत्र अवैध : मंदाकिनी गोडसे पायउतार; कार्यवाही सुरू

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच मंदाकिनी गोडसे यांचे कुणबी जातप्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. त्यांचा इतर मागास प्रवर्गातील कुणबी जातीचा दावाही अवैध ठरविण्यात आल्याचा आदेश नाशिकच्या जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे.माजी ग्रामपंचायत सदस्य आत्माराम फोकणे यांनी गोडसे यांच्या विरोधात जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार केली होती. वर्षभरापासून अनेकदा झालेल्या सुनावण्यांद्वारे दोन्ही पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. नाशिकच्या जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटोळे, सदस्य माधव वाघ, सदस्य सचिव संगीता डावखर यांच्या त्रिसदस्यीय समितीने गोडसे यांचे जातप्रमाणपत्र रद्द करून त्यांच्या जातीचा दावा अवैध ठरविला.घोटी खुर्द येथील मंदाकिनी गोडसे यांनी इतर मागास प्रवर्गातील हिंदू कुणबी जातीच्या दाखल्यावर थेट सरपंचपदाची निवडणूक लढवली होती. गोडसे यांनी नामनिर्देशन पत्र भरताना कुणबी जातीचे नसताना खोटे पुरावे, खोटे प्रतिज्ञापत्र व घोषणापत्र सादर केले होते. गोडसे यांनी जातप्रमाणपत्र काढताना खोटी वंशावळ जोडून कुणबी जातीचा खोटा दाखला मिळवण्यासाठी त्रयस्थ व्यक्तींच्या जातीच्या पुराव्यांचा गैरवापर केला होता. याबाबत तक्र ारदार माजी ग्रामपंचायत सदस्य आत्माराम फोकणे यांनी पुरावे सादर केले होते.

प्रांताधिकाऱ्यांची दिशाभूल करून गोडसे यांनी कुणबी जातीचा दाखला घेतला होता. माझ्याकडील पुराव्यांच्या बळावर न्यायदेवतेने गोडसे यांचे पितळ उघडे पाडले. हा विजय सर्व ग्रामस्थांचा आहे, असे मी समजतो.

- आत्माराम फोकणे, तक्र ारदार

टॅग्स :sarpanchसरपंच