शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

गेटमनच्या सतर्कतेने अनर्थ टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 01:21 IST

देवळाली कॅम्प-लहवित दरम्यान रेल्वे मोरीखालील भराव अतिवृष्टी व पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने मोरीवरील रेल्वे पूल रुळ व स्लीपर लटकत असल्याचे रेल्वे गेटमनच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. रविवारी दुपारी मोरीखालील भराव वाहून गेल्याचे रेल्वे प्रशासनाला समजल्यानंतर सोमवारी पहाटेपर्यंत युद्धपातळीवर रेल्वे मोरी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे वाहतूक सुरू झाली.

नाशिकरोड : देवळाली कॅम्प-लहवित दरम्यान रेल्वे मोरीखालील भराव अतिवृष्टी व पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने मोरीवरील रेल्वे पूल रुळ व स्लीपर लटकत असल्याचे रेल्वे गेटमनच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. रविवारी दुपारी मोरीखालील भराव वाहून गेल्याचे रेल्वे प्रशासनाला समजल्यानंतर सोमवारी पहाटेपर्यंत युद्धपातळीवर रेल्वे मोरी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे वाहतूक सुरू झाली.मुसळधार पावसामुळे देवळाली कॅम्प-लहवित दरम्यान रेल्वे गेट ८४ येथील गेटमन शिवाजी मालुंजकर हे आपल्या हद्दीतील रेल्वे लाईन व मोरीची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना देवळाली कॅम्प-लहवित दरम्यान १७८/६-८ या रेल्वे मोरीचा एक भाग मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्याचे लक्षात आले. मोरीच्या एका बाजूचा भराव वाहून गेल्याने तेथील रेल्वे रुळ व त्याखालील लोखंडी स्लीपर्स लटकत होते. सदर बाब मालुंजकर यांनी तातडीने देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकाच्या अधीक्षकांना कळवली. सदर घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक एन. व्ही. गुहिलोत, रेल्वे बांधकाम विभागाचे अभियंता, रेल्वे अधिकारी आदींनी लहवित जवळील रेल्वे मोरीची पाहणी केली. गेटमन मालुंजकर यांच्या सतर्कतेमुळे मोठा धोका टळला. रेल्वे प्रशासनाने तत्काळ आपद्ग्रस्त रेल्वे बोगीतून सीमेंट, खडी आदी साहित्य आणून दुरु स्तीचे काम हाती घेतले. रविवारी दुपारी सुरू झालेले मोरी दुरु स्तीचे काम सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास आटोपले. दरम्यान मुंबई-नाशिक दरम्यानची रेल्वे सेवा पावसामुळे बंद असल्याने रेल्वे मोरी भराव दुरु स्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करता आले. त्यानंतर नाशिकरोडहून पहिली गोदावरी एक्स्प्रेस ही मुंबईला सहीसलामत रवाना झाली.पाहणी करताना आले निदर्शनासअतिवृष्टीमुळे लहवित जवळील रेल्वे गेट ८४ चे गेटमन शिवाजी मालुंजकर आपल्या हद्दीत भर पावसात पाहणी करीत असताना त्यांना मोरी खालील भराव वाहून गेल्याचे निदर्शनास आले. मालुंजकर यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरRainपाऊसcentral railwayमध्य रेल्वे