शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये परवानगीसाठी पथकच गणेश मंडळांच्या दाराशी

By श्याम बागुल | Updated: September 6, 2018 15:25 IST

गणेश मंडळांना लागणा-या विविध परवानग्यांसाठी महापालिकेने एक खिडकी योजना सुरू केली होती, परंतु पहिली परवानगी कोणी द्यायची यावर एकमत होत नसल्याने गणेश मंडळांना परवानगीसाठी चालढकल केली जात होती. त्यावर सर्वत्र असंतोष निर्माण झाल्यावर महापालिका आयुक्तांबरोबर गणेश

ठळक मुद्देदमछाक थांबली : जागेवरच मंडप, कमानीची पाहणीपोलिस, शहर वाहतूक शाखा, मनपा बांधकाम, अग्निशामक व वीजवितरण कंपनी अधिका-यांचा पथकात समावेश

नाशिक : गणेशोत्सव कालावधीत विविध परवानग्या घेण्यासाठी दरवर्षीच सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांची होणारी दमछाक टाळण्यासाठी प्रशासनाने यंदा यावर तोडगा काढत मंडळांची ऐनवेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी एक खिडकी पथक मंडळांच्या दारी योजना सुरू केल्याने यावर्षी पासून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांची विविध परवानग्यांसाठी होणारी दमछाक थांबणार आहे.गणेश मंडळांना लागणा-या विविध परवानग्यांसाठी महापालिकेने एक खिडकी योजना सुरू केली होती, परंतु पहिली परवानगी कोणी द्यायची यावर एकमत होत नसल्याने गणेश मंडळांना परवानगीसाठी चालढकल केली जात होती. त्यावर सर्वत्र असंतोष निर्माण झाल्यावर महापालिका आयुक्तांबरोबर गणेश मंडळ पदाधिका-यांच्या झालेल्या बैठकीत परवानगीसाठी लागणा-या अटी, नियम शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एक खिडकी योजनेतील पथक थेट उत्सवासाठी परवानगी मागणा-या मंडळांच्या ठिकाणी जाऊन तेथे भेटी देत पाहणी करून अंतिम परवानगी पोलीस प्रशासन देणार आहे. स्थानिक पोलिस ठाण्यातील कर्मचारी, शहर वाहतूक शाखा, मनपा बांधकाम, अग्निशामक व वीजवितरण कंपनी अधिका-यांचा पथकात समावेश करण्यात आला आहे.गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडप उभारणीला परवानगी मिळावी यासाठी ज्या मंडळांनी मनपा प्रशासनाकडे अर्ज सादर केले आहेत त्या मंडळांचे अर्ज घेऊन पथक दैनंदिन त्या भागात जाऊन मंडळांच्या भेटी घेत आहेत. तेथे गेल्यानंतर मंडप उभारणीसाठी किती जागेची परवानगी घेतली याची तपासणी करून रस्त्याचा मोजमाप वाहतुकीला अडथळा होणार नाही धोकेदायक वीजतारा याची पाहणी पथकाकडून केली जात आहे. सर्व पाहणी झाल्यानंतर काही अडचण येऊ शकता की नाही याबाबत मनपा, वाहतूक शाखा, वीज वितरण कंपनी पोलीस ठाण्यांना ना हरकत दाखला देतील व संबंधित पोलीस ठाणे पुढे सहायक पोलीस आयुक्तांकडे अहवाल सादर करतील त्यानुसार रीतसर परवानगी मिळणार आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक