शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्यावेळी पोतडीतल्या गोष्टी बाहेर काढू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 16:07 IST

राज ठाकरे : पेठ येथील दौ-यात नागरिकांशी संवाद

ठळक मुद्दे राज यांनी कांदा प्रश्नी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करत सत्तेत बसलेल्या लोकांना निवेदनाची भाषा कळत नसल्याचे सांगितले

पेठ : आपल्या पोतडीत काय काय गोष्टी आहेत, त्या निवडणुकीच्यावेळी बाहेर काढू, असा इशारा देत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पेठ तालुक्यातील नागरिकांशी संवाद साधला. याचवेळी, राज्य सरकारने कांद्याला दर क्विंटलमागे जाहीर केलेल्या २०० रुपये अनुदानाबाबत आपण समाधानी नसल्याचेही राज यांनी सांगत शेतक-यांसाठी आंदोलनाचे संकेत दिले.राज ठाकरे यांनी गुरु वारी (दि.२०) पेठ तालुक्याचा दौरा करून शेतक-यांसह व्यापारी व इतर संघटनांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. यावेळी, राज यांनी कांदा प्रश्नी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करत सत्तेत बसलेल्या लोकांना निवेदनाची भाषा कळत नसल्याचे सांगितले. दरम्यान, राज ठाकरे पेठ दौ-यावर येणार असल्याने पेठसह दिंडोरी, हरसुल, सुरगाणा, ननाशी या भागातून मोठया प्रमाणावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यात्रा मैदानावर उभारलेल्या व्यासपीठावर त्यांनी जनतेशी संवाद साधतांनाच शेतक-यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधत शासनाला धारेवर धरले. जाहीर सभेचे नियोजन नसतांनाही केवळ तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत यांच्या आग्रहात्सव आपण व्यासपिठावर आलो असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर विश्रामगृहावर विविध सामाजिक संस्थासह शेतकरी, व्यापारी, पोलीस पाटील संघटना यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली. नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्ष मनोज घोंगे, कुमार मोंढे यांनी राज ठाकरे यांचे स्वागत केले. याप्रसंगी आमदार बाळा नांदगावकर, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, नगरसेवक सलिम शेख, प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, ग्रामीण जिल्हाध्यक्ष रतन कुमार इचम, अनंता सुर्यवंशी, उपाध्यक्ष मनोज ढिकले, तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत यांचेसह मनसे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकRaj Thackerayराज ठाकरे