शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार गुणपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:35 IST

दहावीच्या निकालानंतर उत्तीर्ण झालेल्या दोन लाख विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेचा अर्ज दाखल करण्यासाठी प्रतीक्षा असलेली गुणपत्रिका येत्या दोन दिवसांत विद्यार्थ्यांच्या हाती पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नाशिक विभागीय मंडळाला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या (दहावी) अर्थात गुणपत्रिका गुरुवारी रात्र प्राप्त झाल्या असून, विभागीय मंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून रात्री उशिरापर्यंत या गुणपत्रिकांचे जिल्हानिहाय वर्गीकरण करण्याचे काम सुरू होते.

ठळक मुद्देदोन लाख विद्यार्थ्यांना प्रतीक्षा : वर्गीकरणाचे काम सुरू

नाशिक : दहावीच्या निकालानंतर उत्तीर्ण झालेल्या दोन लाख विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेचा अर्ज दाखल करण्यासाठी प्रतीक्षा असलेली गुणपत्रिका येत्या दोन दिवसांत विद्यार्थ्यांच्या हाती पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नाशिक विभागीय मंडळाला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या (दहावी) अर्थात गुणपत्रिका गुरुवारी रात्र प्राप्त झाल्या असून, विभागीय मंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून रात्री उशिरापर्यंत या गुणपत्रिकांचे जिल्हानिहाय वर्गीकरण करण्याचे काम सुरू होते.दहावीचा निकाल शनिवारी (दि.८) जाहीर झाला असून, यावर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत दहावीच्या निकालात तब्बल ९.८४ टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यामुळे परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरी या विद्यार्थ्यांना जुलै महिन्यात पुन्हा पुरवणी परीक्षा देण्याची संधी आहे.उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही गुणपत्रिकांची प्रतीक्षा असून, आगामी दोन ते तीन दिवसांत विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये गुणपत्रिका प्राप्त होऊ शकणार आहे. त्यासाठी विभागीय मंडळांकडून जिल्हा, तालुका, केंद्र आणि शाळानिहाय विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांची पाकिटे भरण्याचे काम सुरू आहे.४महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव या चारही जिल्ह्यांत दि. ११ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत प्रात्यक्षिक, तर दि. १ ते २२ मार्च या कालावधीत ४३३ परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षांचे एकत्रिक गुणपत्रक विभागीय कार्यालयाला पोहच झाले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकSSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थी