शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता, उद्यानाच्या  विषयांवरून गाजली सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:34 IST

पूर्व प्रभाग सभेत स्वच्छता आणि उद्यान या दोन विषयांवर प्रशासनाला सदस्यांनी धारेवर धरले होते तसेच उद्यानाची देखभाल होत नसेल तर संबंधित ठेकेदारास बिल न देण्याचे सदस्यांनी मागणी केली.

इंदिरानगर : पूर्व प्रभाग सभेत स्वच्छता आणि उद्यान या दोन विषयांवर प्रशासनाला सदस्यांनी धारेवर धरले होते तसेच उद्यानाची देखभाल होत नसेल तर संबंधित ठेकेदारास बिल न देण्याचे सदस्यांनी मागणी केली.  पूर्व प्रभागसभा सभापती सुमन भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली बोलण्यात आली होती. यावेळी प्रभाग ३० मध्ये लहान-मोठ्या रस्त्याचे स्वच्छतेविषयी आम्ही नियोजन करून दिले होते. त्यामुळे स्वच्छता चांगली होत होती. परंतु नियोजन प्रमाणे स्वच्छता होत नसल्याने पुन्हा रस्त्यावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, तसेच स्वच्छता कर्मचारी काम करत नसल्याची तक्र ार सतीश सोनवणे यांनी केली. पूर्व प्रभागातील आणि प्रभाग ३० मधील उद्यानांची अवस्था दैना झाली असून, संबंधित ठेकेदार काम करत नसल्याने त्याची बिले न काढण्याची मागणी अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी केली. सायंकाळ होताच वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सार्थकनगर बसथांबा ते कैलासनगर बसथांबा या रस्त्याच्या दुतर्फा विक्रेत्यांच्या हातगाड्या लागत असल्याने चौपाटीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार बडोदे यांनी केली. प्रभागातील सर्वच उद्यानाची दुरवस्था झाली असून. त्याची देखभाल संबंधित ठेकेदार करीत नाही. त्यामुळे आम्हाला स्वखर्चाने उद्यानाची देखभाल करावी लागते, असे डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी तक्रार केली तसेच प्रभागात डेंगूसदृश आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असून, मलेरिया विभाग काम करत नसल्याची तक्र ार कुलकर्णी यांनी केली काठेगल्ली सिग्नल ते नागजी सिग्नल या रस्त्यादरम्यान दुतर्फा विक्री त्यांचे हात गाडी उभी राहत असल्याने वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्र ार गेल्या सभेस करूनही अद्यापि परिस्थिती जैसे थेच असल्याचे अर्चना थोरात यांनी सांगितले तसेच स्वच्छता कर्मचारी स्वच्छता केल्यानंतर कचरा रस्त्याच्या कडेला ठेवता ते उचलण्यासाठी ढकलगाड्या केव्हा मिळणार? असा प्रश्न सुषमा पगारे यांनी केला. अशोका मार्गावर स्वच्छता कर्मचारी स्वच्छता करीत नसल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे तसेच युनिक कॉलनी फिरणारा घंटागाडीचालक कचरा घेताना नागरिकांकडून पैसे मागतो, अशी तक्र ार शाहीन मिर्झा यांनी केली.त्या विक्रेत्यांवर होणार कारवाईकाठेगल्ली सिन्नर ते नागजी सिग्नल रस्त्याच्या दुतर्फा अनेक विक्रेते व्यवसाय करतात. हा रहदारीचा मार्ग असून त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याची तक्रार सदस्यांनी केली. त्यामुळे विक्रे त्यांवर गुन्हे दाखल करण्याची सूचना विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांनी दिले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक