शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गांजा तस्करीतील फरार संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:40 IST

गत सहा महिन्यांपूर्वी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने शिवसेनेची महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे हिच्या गुदामावर छापा मारून कोट्यवधी रुपये किमतीचा हजारो किलो गांजा जप्त केला होता. या प्रकरणातील फरार संशयित अशोक मगन मोहिते (३५,बेलदारवाडी, म्हसरूळ) यास गुन्हे शोध पथकाने मालेगाव येथून अटक केली आहे. गांजा तस्करी प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत लक्ष्मी ताठेसह दहा संशयितांना अटक केली आहे.

ठळक मुद्देगुन्हे शाखेची कामगिरी : सहा महिन्यांपासून फरार

पंचवटी : गत सहा महिन्यांपूर्वी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने शिवसेनेची महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे हिच्या गुदामावर छापा मारून कोट्यवधी रुपये किमतीचा हजारो किलो गांजा जप्त केला होता. या प्रकरणातील फरार संशयित अशोक मगन मोहिते (३५,बेलदारवाडी, म्हसरूळ) यास गुन्हे शोध पथकाने मालेगाव येथून अटक केली आहे. गांजा तस्करी प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत लक्ष्मी ताठेसह दहा संशयितांना अटक केली आहे.जुलै २०१८ मध्ये तपोवनातील लक्ष्मीनारायण मंदिरासमोर एका चारचाकी वाहनातून गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना मिळाली होती़ त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक बलराम पालकर आदींसह पथकाने सापळा रचून या वाहनातून लाखो रुपये किमतीचा सुमारे ६८० किलो गांजा जप्त केला होता. या गांजाची तस्करी करणाऱ्या संशयितांचा पोलीस शोध घेत असताना शिवसेना महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे हे नाव पुढे आले होते़दरम्यान या प्रकरणातील दहावा संशयित अशोक मोहिते हा मालेगावला असल्याची माहिती पथकास मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बलराम पालकर, संजय मुळक, दिलीप मुंडे, येवाजी महाले, गणेश वडजे, बंटी चव्हाण आदींनी मालेगाव येथून मोहितेला अटक केली.या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सुमारे १ कोटी रुपयांचा एक हजार आठशे किलो गांजा जप्त केला आहे.तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांना ‘कोटपा’नाशिक : शाळा, कॉलेजच्या शंभर यार्ड परिसरात सिगारेट, गुटखा, खैनी यांसारख्या तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी असल्याने सदर मोहीम यापुढे व्यापक प्रमाणात राबविण्यात येणार आहे. यासाठी संस्थाचालक, संस्था याबरोबरच पालकांनादेखील सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करण्यास बंदी असतानाही चोरट्यापद्धतीने अशाप्रकारची विक्री होताना दिसते.या विक्रीच्या विरोधात वारंवार सूचना आणि कारवाई करूनही शाळा, कॉलेजच्या परिसरात अशाप्रकारचे अड्डे निर्माण झाले आहेत. या ठिकाणी गुन्हेगारी स्वरूपाच्यादेखील घटना घडत असल्याने आता यापुढे अशा ठिकाणांवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.चोरीछुप्या पद्धतीने बेकायदेशीर अमली पदार्थ विकणाºयांवर ‘कोटपा’ कायद्याचा चाप बसविण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी कोटपा कायद्याचे खास प्रशिक्षण नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपअधीक्षक सुरेश जाधव, अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अशोक करपे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयात देण्यात आले. कर्करोगतज्ज्ञ डॉ. शैलेश बोंदार्डे यांनी यावेळी तंबाखूमुळे होणाºया कॅन्सरबाबत सविस्तर माहिती दिली, तर संबंध हेल्थ फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य व्यवस्थापक देवीदास शिंदे यांनी सिगारेट्स आणि तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक (कोटपा) कायद्याची कलमे, कारवाई आणि प्रभावी अंमलबजावणीबाबत खास प्रशिक्षण नाशिक ग्रामीण पोलिसांना दिले.कोटपा कायद्याच्या सततच्या कारवाया केरळ आणि कर्नाटक राज्यात तंबाखूचा वापर कमी करण्यास प्रभावी ठरल्या आहेत. महाराष्ट्रातदेखील पोलिसांबरोबर काम करण्यास आम्हाला आनंद होत असल्याचे केअरिंग फ्रेंड्सचे निमेश सुमती यांनी सांगितले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी