शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

गावठाणांची ड्रोनद्वारे होणार मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 01:40 IST

गावांचा विकास साधण्याबरोबरच गावठाणाची हद्द निश्चित करण्यासाठी आता ड्रोनच्या साह्याने जिल्ह्यातील गावांची मोजणी होणार आहे.

नाशिक : गावांचा विकास साधण्याबरोबरच गावठाणाची हद्द निश्चित करण्यासाठी आता ड्रोनच्या साह्याने जिल्ह्यातील गावांची मोजणी होणार आहे. या मोजणीच्या माध्यमातून गावठाणाचे डिजिटल नकाशे तयार होणार असल्याने गावठाण विकासाला यामुळे चालना मिळणार आहे. विधानसभा निवणुकीनंतर या कामाला गती येणार असून, तत्पूर्वी गावांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.विस्तारलेल्या गावठाणाचा विकास करण्यासाठी शाश्वत मोजणी अपेक्षित आहे.  मात्र गावठाणातील अतिक्रमण आणि अन्य कारणांमुळे गावठाणाची हद्द निश्चित करण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आज ड्रोनद्वारे मोजणी केली जाणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून मोजणी ही पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी वेळेत आणि अचूक होण्यास मदत होणार आहे. याशिवाय कमी मनुष्यबळात अद्ययावत, अशी माहिती आणि डिजिटल नकाशेदेखील यामुळे उपलब्ध होणार असल्याने गावकऱ्यांना लवकरच जमिनीची सनद मिळणे सुलभ होणार आहे. या संदर्भात जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनीदेखील नुकतीच या कामकाजाची माहिती घेतल्याचे समजते.१९३० नंतर गावठाणच्या मोजणीचे काम झालेले नाही. म्हणजेच स्वातंत्र्यापूर्वी गावठाणाची मोजणी करण्यात आली होती. आता गावठाणाच्या विस्तारलेल्या कक्षा लक्षात घेता गावातील रस्ते, शासनाच्या जागा, ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, गावातील चतु:सीमा निश्चित होऊन या मिळकतींचे अभिलेख तयार होणार असून, गावातील नागरिकांना जमिनीची सनद म्हणजेच मालकी हक्काचा पुरावा अचूक तयार होणार आहे. याबरोबरच ड्रोन छायाचित्रांसह डिजिटल नकाशा तयार होणार आहे. ज्या गावठाणांमध्ये अद्यापही सर्वेक्षण झालेले नाही असा ठिकाणी ड्रोनद्वारे भूमापन केले जाणार असून, जिल्ह्णात प्रथमच अशाप्रकारचे भूमापन होणार आहे.ड्रोन मोजणीमध्ये ग्रामपंचायती कार्यक्षेत्रातील मिळकतींच्या मालमत्ता कराची आकारणी, अन्य करांची आकारणी, महसुलाचे नियोजन करणे सुलाभ होणार आहेच शिवाय मिळकतींच्या सीमादेखील निश्चित होणार आहेत. विकास आराखडा तयार करताना या मोजणीचादेखील उपयोग होणार आहे.निवडणुकीनंतर होणार मोजणीजिल्ह्णात सदर मोहीम राबविण्यास काहीसा विलंब होणार आहे. सध्या निवडणुकीची धामधूम असल्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतरच या कामाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी गावागावांमध्ये ड्रोनच्या माध्यमातून होणाºया मोजणीबाबतची जनजागृती करावी लागणार आहे.ड्रोन मोजणीचे लाभ१) ड्रोनच्या साह्णाने करण्यात येणाºया मोजणीमुळे अचुक सीमा आणि डिजिटल छायाचित्रे तयार होणार आहेत.२) गावातील अतिक्रमण आणि शासकीय जमिनीची अचुक माहिती मिळणे होणार सुलभ.३) ग्रामपंचायतींना कराचे धोरण आखण्यासाठी उपयुक्त माहिती.४) जमीनधारकांना लागलीच जमिनीची सनद मिळणार. यामुळे कर्ज प्रकरणात होणार लाभ.६) बांधकामासाठी डिजिटल नकाशा ठरू शकतो अधिकृत पुरावा.७) हद्द निश्चितीमुळे विकासाची ठरणार दिशा.८) हद्दीच्या वादावर प्रभावी उपाय.पुणे येथील पथदर्शी प्रकल्पपुणे जिल्ह्यातील सोनोरी गावाची मोजणी प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली होती. येथील नागरिकांना काही दिवसांतच जमिनीची सनद देण्यात आली होती. गावातील मिळकतींचे नकाशेदेखील तयार करण्यात आले होेते. गावातील प्रत्येक भूखंडधारकाला त्याच्या भूखंडाचा नकाशा आणि मालकी हक्काचा पुरावा म्हणून मिळकत पत्रिका उपलब्ध झाले होते.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashikनाशिक