शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

महागड्या दराने ‘लॅपटॉप’ची खरेदी, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे गौडबंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 05:28 IST

नाशिक : तलाठी व मंडळ अधिका-यांना संगणकीय प्रणालीवर काम करण्यासाठी शासनाच्या वतीने महागडे लॅपटॉप खरेदी करून पुरविण्यात आल्याने त्याचा फटका नाशिकसह राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांना बसला.

नाशिक : तलाठी व मंडळ अधिका-यांना संगणकीय प्रणालीवर काम करण्यासाठी शासनाच्या वतीने महागडे लॅपटॉप खरेदी करून पुरविण्यात आल्याने त्याचा फटका नाशिकसह राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांना बसला. शिवाय खर्चासाठी तरतूद करण्यात आलेल्या रकमेत सर्वांनाच लॅपटॉप मिळू शकले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.‘कॉमनेट’ कंपनीने आकारलेले लॅपटॉपचे दर परवडत नसल्याचे कारण देत काही जिल्ह्यांनी माहिती व तंत्रज्ञान विभागाला स्पष्ट शब्दात नकार देऊन स्वत:च्या अखत्यारित खरेदी केल्याने त्यांचे लाखो रुपये तर वाचलेच शिवाय आवश्यक तितक्या लॅपटॉपची खरेदी पूर्ण करता आली आहे.शासनाने गतिमान व पारदर्शक कामकाजासाठी गावपातळीवर तलाठी, मंडळ अधिकाºयांना आॅनलाइन कामकाजासाठी ‘लॅपटॉप’ देण्याचा निर्णय घेतला होता व त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याने आर्थिक तरतूद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. एका लॅपटॉपसाठी ४० हजार रुपये खर्च गृहीत धरून ३६ जिल्ह्यांनी अंदाजपत्रक सादर करून जिल्हा नियोजन समितीतून कोट्यवधींचा निधी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे वर्ग केला. शासनाने लॅपटॉप खरेदीसाठी राज्यपातळीवर निविदा मागविल्यानंतर मुंबईतील ‘कॉमनेट’ कंपनीने त्यासाठी निविदा भरली व ६१,२५७ रुपये प्रति नग दराने निविदा मंजूर झाली. मात्र गृहित रकमेपेक्षा साधारणत: २० ते २५ हजार रुपये अतिरिक्त मोजावे लागल्यामुळे जिल्ह्यांनी दिलेल्या निधीच्या तुलनेतच ‘कॉमनेट’ कंपनीने लॅपटॉप पुरविले आहेत.>६५० ऐवजी ३५५ लॅपटॉपनाशिकने अडीच कोटी रुपये देऊन ६५० लॅपटॉप अपेक्षित धरले होते, प्रत्यक्षात फक्त ३५५ लॅपटॉप मिळाले. राज्यांतील २१ जिल्ह्यांनी दिलेल्या कोट्यवधी रुपयांतून फक्त ४,२७५ लॅपटॉप वाटप करण्यात आले आहेत.माहिती व तंत्रज्ञान विभागाने लॅपटॉपसाठी ठरविलेली ६१ हजारांची रक्कम पाहून जवळपास पंधरा ते सोळा जिल्ह्यांनी नकार देत स्थानिक पातळीवरच खरेदीचा निर्णय घेतला. त्यामुळे जळगाव, कोल्हापूरसह काही जिल्ह्यांनी अवघ्या ३५ ते ४० हजारांत लॅपटॉप खरेदी केला. त्यासोबत प्रिंटर्स प्राप्त करून घेतले.

टॅग्स :laptopलॅपटॉप