शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

गॅसने भरलेला टॅँकर पलटला; जिवीतहानी टळली

By admin | Updated: May 31, 2014 02:03 IST

आडगाव शिवार : रिक्षाला वाचविण्याच्या प्रयत्नात घडली घटना

आडगाव शिवार : रिक्षाला वाचविण्याच्या प्रयत्नात घडली घटनापंचवटी : नाशिककडून ओझरकडे जाणारा इण्डेन गॅस कंपनीचा गॅसने भरलेला टॅँकर सकाळच्या सुमाराला आडगाव शिवारातील मुख्य रस्त्यावर पलटी झाल्याची घटना घडली. गॅसने भरलेला टॅँकर असला तरी सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीत वा वित्तहानी झाली नसल्याने नागरीकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सकाळी साडेआठ वाजता मेडीकल फाटा चौफुलीवर ही घटना घडली. टॅँकर क्रमांक (जी जे १२ अे टी ६९५२) हा नाशिकडून मनमाड (पानेवाडी) येथे जाण्यासाठी निघाला सकाळी साडेआठ वाजता टॅँकर मेडीकल फाटयावरील चौफुलीवर येताच रिक्षाचालकाने रिक्षा आडवी मारल्याने रिक्षाला वाचविण्याच्या प्रयत्नात टॅँकरचालकाने ब्रेक मारला व टॅँकर पलटी झाला. गॅसने भरलेला टॅँकर असल्याने चालक व क्लिनरने तत्काळ उडी मारून पळ काढला त्यानंतर नागरीकांची पळापळ झाली. टॅँकर पलटी झाल्याबाबत मुख्य अग्निशामक नियंत्रण कक्षाने पंचवटी अग्निशामक दलाला माहीती कळविली. त्यांनतर घटनास्थळी पंचवटी अग्निशामक दलाचे पंडीत तिडके हे पथकासमवेत तर आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव महाजन हे कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. गॅस टॅँकर पलटला असल्याने त्यातून गॅसगळती होत आहे की नाही याची खात्री केल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. गॅस टॅँकर पलटल्याने आडगावकडून नाशिककडे व नाशिककडून आडगाव बाजूने जाणार्‍या रस्त्यावर दुतर्फा वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. वाहतूक कोंडी झाल्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी वेळेवर दाखल न झाल्याने खाकी वर्दीतील कर्मचार्‍यांनाच वाहतूक पोलीसाची भूमिका बजवावी लागली. दरम्यान दुपारी क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेला टॅँकर रस्त्यात पुन्हा सरळ करण्यात आला होता. टॅँकरमध्ये गॅस भरलेला असल्याने व पलटी झाल्यामुळे वाहनाचे नुकसान झाले असुन कंपनीचे संबंधित अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतरच अपघातग्रस्त टॅँकर बाजूला करण्याचे काम करण्यात येणार असल्याचे पोलीसांनी सांगितले. (वार्ताहर) इन्फो बॉक्सरिक्षाचालकामुळेच अपघातथांबा नसतांना रस्त्यात रिक्षा थांबविणे, एखाद्या प्रवाशाने हात दिल्यानंतर भर रस्त्यात रिक्षा उभ्या करणे, अशाप्रकारे एक ना अनेक तक्रारी बेशिस्त रिक्षाचालकांच्या असतात. आज आडगाव शिवारात गॅसने भरलेला टॅँकर पलटला या घटनेला रिक्षाचालक कारणीभूत असुन रिक्षाचालकाने रिक्षा आडवी मारली व रिक्षाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने बे्रक मारला त्यामुळेच टॅँकर पलटी झाल्याची घटना घडल्याची चर्चा आहे.