शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडरच्या स्फोटात चार घरे संपूर्ण खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 01:41 IST

दात्याणे येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन चार घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने घरात एकही व्यक्ती नसल्याने जीवितहानी टळली.

ठळक मुद्देदात्याणेतील घटना; संसारोपयोगी वस्तूंसह रोख रक्कम भस्मसात

कसबे सुकेणे : येथून जवळच असलेल्या दात्याणे येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन चार घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने घरात एकही व्यक्ती नसल्याने जीवितहानी टळली.ओझर-सुकेणे रस्त्यावरील दात्याणे येथील महादेवनगर परिसरात राहणाऱ्या शेतमजुरांच्या घरांना सकाळी १० वाजेच्या सुमारास आग लागली. सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू असल्याने घरातील स्त्री व पुरुष शेतात मजुरी करण्यासाठी सकाळी लवकरच बाहेर पडले होते. लहान मुलेही शाळेत गेली असल्याने घरात कोणीही नव्हते. सकाळी १० वाजेच्या सुमारास सुरेश निवृत्ती हिलम यांच्या राहत्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. मोठ्या आवाजाने परिसर हादरून गेला. काय झाले हे समजण्याच्या आत सुरेश हिलम यांच्या घराशेजारी असणाऱ्या संदीप निवृत्ती हिलम, विठ्ठल निवृत्ती हिलम, भगवान खंडू पवार यांच्या घरांनीही पेट घेतल्याने घरातील सर्व संसारोपयोगी वस्तूसह रोख रक्कम, दागिने, धान्य व इतर किमती ऐवज जळून खाक झाला. पिंपळगाव ग्रामपंचायत व एचएएल कंपनीच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणली; पण तोपर्यंत घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या होत्या. घटनास्थळी ओझरचे पोलीस निरीक्षक मथुरे, ओझरचे मंडल अधिकारी प्रशांत तांबे, तालठी कल्पना पवार, पोलीसपाटील रमेश टोगरे, ग्रामसेवक दिधळे यांनी भेट देऊन पंचनामा केला. घटनेचे वृत्त समजताच माजी आमदार दिलीप बनकर, पिंपळगाव बाजार समितीचे संचालक निवृत्ती धनवटे, सरपंच भूषण धनवटे यांनी घटनास्थळी भेट दिली. ओणे येथील शरद हाळदे यांनी आपल्या स्वखर्चाने या चारही कुटुंबांना भांड्यांचे वाटप केले.पैसे, दागिने, कागदपत्रांसह सर्व संसार जळून खाक झाल्याने हिलम व पवार परिवारास अश्रू अनावर झाले होते. परिसरातील शेतकरी व युवकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

टॅग्स :Nashikनाशिकfireआग