शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
2
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
3
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
4
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
5
'नीट' रद्द करून गैरप्रकारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी
6
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
7
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
8
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
9
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
10
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
11
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
12
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
13
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
14
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
15
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
16
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
17
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
18
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
19
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
20
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?

नांदगावी बागेत लागलेल्या आगीत झाडे, वनस्पती जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 1:07 AM

नांदगाव : अज्ञात इसमाने फेकलेली जळती सिगारेट, विडी अशा तत्सम अग्निजन्य वस्तूमुळे शनिमंदिराजवळील बागेला आग लागून येथील अनेक झाडे व वनस्पती जळून खाक झाल्याची घटना घडली. गेल्या वर्षी अशाच प्रकारे बागेच्या पश्चिम कोपऱ्यात आग लागल्याची घटना घडली होती. शहरातील आबालवृद्धांचे हे एकमेव विरंगुळ्याचे ठिकाण आहे.

ठळक मुद्देशहरातील आबालवृद्धांचे हे एकमेव विरंगुळ्याचे ठिकाण

नांदगाव : अज्ञात इसमाने फेकलेली जळती सिगारेट, विडी अशा तत्सम अग्निजन्य वस्तूमुळे शनिमंदिराजवळील बागेला आग लागून येथील अनेक झाडे व वनस्पती जळून खाक झाल्याची घटना घडली. गेल्या वर्षी अशाच प्रकारे बागेच्या पश्चिम कोपऱ्यात आग लागल्याची घटना घडली होती. शहरातील आबालवृद्धांचे हे एकमेव विरंगुळ्याचे ठिकाण आहे.बागेच्या उत्तर दिशेकडून आगीचे लोळ उठल्याचे लक्षात आल्यावर अनेक नागरिकांनी तिकडे धाव घेतली. संतोष गुप्ता, दीपक भावसार, रामदास बावणे, समाधान दाभाडे, सुलतान शाह, बाळासाहेब पवार, अरबाझ कलीम मनियार, रामभाऊ बनबेरू अशा अनेकांनी जवळून बादलीने पाणी आणून आग विझविण्याचे प्रयत्न केले. बागकाम कर्मचारी दीपक देशपांडे आज सुटीचा दिवस असल्याने हजर नव्हता. दरम्यान, नगरपालिकेचा पाणीपुरवठ्याचा ट्रॅक्टर आणून पाइपलाइन जोडून त्यावर पाणी मारण्यात आले. तोपर्यंत नागरिकांनी आग आटोक्यात आणली होती. नांदगाव नगरपालिकेचा नवा कोरा बंब चालकाची नियुक्ती झालेली नसल्याने दोन वर्षांपासून एकाच जागी उभा आहे.आपत्कालीन व्यवस्थेसाठी शासनाने तालुकास्तरावर व नगरपरिषद स्तरावर अनेक समित्या व उपाययोजना केलेल्या असताना त्या येथे दिसत नाहीत, अशी चर्चा आग विझविताना नागरिक करताना दिसून आले.छगन भुजबळांच्या संकल्पनेतून सार्वजनिक बांधकाम विभागाने ही बाग बनवली आहे. त्यानंतर आज तिची देखभाल नांदगाव नगरपरिषदेकडे आहे. बागेत अनेक व्यायामाची साधने परिषदेने उपलब्ध करून दिली आहेत. ज्येष्ठ नागरिक येथे फिरायला येत असतात. बागेची किमान देखभाल व्यवस्थित व्हावी, नागरिकांनी हा ठेवा जपावा जेणेकरून नांदगावकरांचे विरंगुळ्याचे एकमेव साधन टिकून राहील, अशी अपेक्षा माजी नगरसेवक संतोष गुप्ता यांनी व्यक्त केली.