शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

घंटागाडी ठेकेदारांच्या खांद्यावर बंदूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:16 IST

शहरात ओला आणि सुका कचऱ्याचे विलगीकरणाबाबत सरकारने महापालिकेला ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. अन्यथा सरकारकडून देण्यात येणाºया अनुदानावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता घनकचरा अलग करून न देणाºयांकडून प्रत्येकी पाच हजारांचा दंड वसूल करण्यासाठी रोज दहा नागरिकांची नावे घंटागाडी ठेकेदारांना देण्याचा फतवा काढल्याचे समजते. निष्क्रिय आरोग्य विभागाने नागरिकांच्या प्रबोधनाबाबत काहीही उपाययोजना न राबविता घंटागाडी ठेकेदारांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे.

नाशिक : शहरात ओला आणि सुका कचऱ्याचे विलगीकरणाबाबत सरकारने महापालिकेला ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. अन्यथा सरकारकडून देण्यात येणाºया अनुदानावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता घनकचरा अलग करून न देणाºयांकडून प्रत्येकी पाच हजारांचा दंड वसूल करण्यासाठी रोज दहा नागरिकांची नावे घंटागाडी ठेकेदारांना देण्याचा फतवा काढल्याचे समजते. निष्क्रिय आरोग्य विभागाने नागरिकांच्या प्रबोधनाबाबत काहीही उपाययोजना न राबविता घंटागाडी ठेकेदा रांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे.  घनकचरा व्यवस्थापनांतर्गत प्रत्येक नागरिकाने ओला आणि सुका कचरा वेगळा करून घंटागाडीत टाकायचा आहे. शिवाय, ठेकेदारानेही विलगीकरण करूनच तो खतप्रकल्पावर न्यायचा आहे. शहरात सद्यस्थितीत घनकचरा विलगीकरणाचे प्रमाण अवघे ३० टक्के असल्याचे सांगितले जाते. यापूर्वी काही विभागात घंटागाडी ठेकेदारांमार्फत ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी नागरिकांना हिरव्या आणि निळ्या रंगाच्या डस्टबिनचे वाटप करण्यात आले होते. परंतु, ठराविक नागरिकांपर्यंतच हा उपक्रम पोहोचला. त्यानंतर आरोग्य विभागाने स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर घनकचरा विलगीकरणासाठी शहरातील व्यापारी पेठात हिरव्या आणि निळ्या रंगांच्या डस्टबिन बसविल्या. परंतु, या डस्टबिन खरेदीतील घोटाळा समोर आला. त्याबाबत प्रशासनाने मात्र, कुठलीही चौकशी केलेली नाही. आता ३१ मार्चअखेर घनकचरा विलगीकरण बंधनकारक केले असून, ते उद्दिष्ट शंभर टक्के साध्य करण्यासाठी प्रशासनावर दबाव वाढला आहे. महापालिकेचा निष्क्रिय आरोग्य विभाग मात्र, त्याबाबत प्रबोधनपर उपाययोजना राबविण्यात कमी पडत आहे. त्यामुळेच प्रशासनाने आता घंटागाडी ठेकेदारांवर दबाव वाढविला असून, घंटागाडी ठेकेदाराने ओला-सुका कचरा अलग करून न देणाºया प्रत्येक विभागातील दहा नागरिकांची नावे कळविण्याचा फतवा काढल्याचे समजते. संबंधित नागरिकांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घंटागाडीचा ठेका देण्यात आला त्यावेळी करण्यात आलेल्या करारनाम्यातच घनकचरा विलगीकरणाची अट घालण्यात आलेली आहे. ठेका दिल्यानंतर वर्षभराने संबंधित ठेकेदारांना घनकचरा विलगीकरण न करणाºया नागरिकांकडून दंड वसूल करण्याचे बंधनकारक केले आहे. त्यामुळे करारनाम्यानुसारच ठेकेदारांना नागरिकांची नावे कळविण्याचे सांगण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली आहे. मात्र, या प्रकारामुळे घंटागाडी कर्मचारी आणि नागरिकांमध्ये संघर्ष उफाळून येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच ठेकेदारही सावध भूमिका घेताना दिसून येत आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका